इंस्टाग्रामवर झाली मैत्री; नंतर, विश्वास संपादन करून तरुणीवर बलात्कार! नोकरी देण्याचं आमिष अन्...
नोकरी देण्याचं आमिष दाखवून एका 23 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विश्वास संपादन करून तरुणीवर बलात्कार!
इंस्टाग्रामवर मैत्री करून तरुणीला नोकरी देण्याचं आमिष दाखवलं अन्...
पीडितेसोबत नेमकं काय घडलं?
Crime News: नोकरी देण्याचं आमिष दाखवून एका 23 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पीडितेची आरोपी तरुणाशी ओळख झाली होती. त्यानंतर, आरोपी तरुणाने पीडितेला नोकरी देण्याचं आमिष दाखवलं आणि तिला एका खोलीत बोलवून तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित घटना बिहारच्या पाटणा येथील काजीपूर परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे.
आरोपीला केली अटक
या प्रकरणासंदर्भात पीडित तरुणीने कदमकुआ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपी राजवीर उर्फ कुंदनला अटक केली. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, घटनेतील आरोपी तरुण हा खगडिया येथील मूळ रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. पीडितेसोबत नेमकं काय घडलं?
हे ही वाचा: मोठी बातमी: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला वेगळंच वळण; आरोपी पीएसआय गोपाळ बदने पोलिसांना शरण...
नोकरी मिळवून आश्वासन दिलं अन्...
सुल्तानगंज पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी असलेली पीडित तरुणी ही नोकरीच्या शोधात होती. दरम्यान, इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिची काजीपुर येथे राहणाऱ्या राजवीर नावाच्या तरुणाशी ओळख झाली. दोघांचंही बोलणं वाढत गेलं आणि त्या काळात पीडितेने आपल्याला नोकरी हवी असल्याचं त्या तरुणाला सांगितलं. त्यानंतर, राजवीरने पीडितेला नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. नोकरीचं आमिष दाखवून आरोपीने पीडित तरुणीला 21 ऑक्टोबर रोजी काजीपुर टोलजवळ असलेल्या आपल्या घरी बोलवलं.
हे ही वाचा: मेन रोडवर बराच वेळ ऑटोरिक्षा उभी असल्याने स्थानिकांना संशय! आत डोकावून पाहिलं तर महिलेचा मृतदेह...
खोलीत पीडितेसोबत घृणास्पद कृत्य
तिथे आरोपी तरुणाने बळजबरीने पीडितेसोबत घृणास्पद कृत्य केलं. या घटनेसंदर्भात, पीडितेने शुक्रवारी कदमकुआ पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीने पीडित तरुणीसारख्या इतर महिलांना सुद्धा नोकरीचं आमिष दाखवून त्यांच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं आहे का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.










