ऑस्ट्रेलियाच्या दोन महिला क्रिकेटपटूंची इंदूरमध्ये छेड काढली, आरोपी दुचाकीस्वाराला पोलिसांकडून अटक
Australian women cricketers molestation : ऑस्ट्रेलियाच्या दोन महिला क्रिकेटपटूंची इंदूरमध्ये छेड काढली, आरोपी दुचाकीस्वाराला पोलिसांकडून अटक
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ऑस्ट्रेलियाच्या दोन महिला क्रिकेटपटूंची इंदूरमध्ये छेड काढली
आरोपी दुचाकीस्वाराला पोलिसांकडून अटक
Australian women cricketers molestation : मध्य प्रदेशातील इंदूर शहरात ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाच्या दोन खेळाडूंसोबत घडलेल्या घटनेमुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. आगामी सामन्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असतानाच, दुचाकीस्वाराने दोन ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी युवकाला अटक केली आहे.
इंदूरमध्ये घडला प्रकार
ही घटना इंदूरच्या रॅडिसन ब्लू हॉटेलजवळ घडली. सूत्रांच्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियन संघातील दोन खेळाडू हॉटेलमधून जवळच्या एका कॅफेकडे जात असताना एका दुचाकीस्वाराने त्यांचा पाठलाग करत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन्ही खेळाडूंनी तात्काळ त्यांच्या सुरक्षा टीमला SOS नोटिफिकेशन पाठवले. माहिती मिळताच सुरक्षा कर्मचारी आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा : अमरावती हादरली, कृषी विभागातील लिपिकाची प्रेम प्रकरणातून हत्या, विवाहित महिलेसोबत होते अनैतिक संबंध
या प्रकरणाची तक्रार ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांनी एमआयजी पोलिस ठाण्यात दिली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी युवक अकील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी काही तासांच्या आत त्याला अटक करून चौकशीला सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासात आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते.










