mumbai news : लोकल ट्रेन हा मुंबईचा श्वास असल्याचं म्हटलं जातं. या लोकलमधून मुंबईतील चाकरमानी घर ते काम असा रोजचाच प्रवास करताना दिसतात. मात्र, याच लोकलमध्ये कधी भांडणंही होते. तर या गर्दीत पाकिट मारणारीही टोळी असते. अनेकदा लोकल ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर चोरांपासून सावध राहण्याचा अनेकदा इशाराही दिला जातो. याच लोकलमधून प्रवास करताना आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. आता अशीच एक घटना ठाणे येथे घडली आहे. मोबाईल फोन चोरी करणाऱ्या तरुणाचा धावत्या ट्रेनमधून तोल गेला आणि तो खाली पडला. या अपघातात त्याचा एक पाय निकामी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना मध्य रेल्वेच्या शहाड आणि आंबिवली स्थानकांदरम्यान घडली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बलात्कार केलेल्या आरोपीला जामीन मंजूर, जेलमधून सुटताच पीडित तरूणीसोबत केलं 'ते' कृत्य!
या भीषाण अपघातानंतर तरुणाने घडलेल्या एकूण अपघाताबाबत माहिती दिली आहे. प्रवाशाचे नाव गौरव निकम असल्याची माहिती समोर आली. अपघातानंतर तरुणाने सांगितलं की, कोणीतरी माझा हात ओढून फोन हिसकावून घेतला आणि त्यानंतर मी खाली पडलो. मध्य रेल्वे पोलिसांनी या घटनेची ऐकूण चौकशी सुरू केली.
नेमकं काय घडलं?
पीडित तरुणाच्या म्हणण्यानुसार, चोराने हातातून मोबाईल फोन हिसकावून घेतल्यावर त्याने ट्रेनचा दरवाजा पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पण तो स्वत:ला वाचवू शकला नाही. यानंतर त्याचा एक पाय ट्रेनच्या चाकाखाली गेला. अशातच त्याचा भीषण अपघात झाला. या अपघातादरम्यान, एका पायाला जबर दुखापत झाली आहे. तरुणावर सध्या एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या युनिटने या संबंधित प्रकरणाचा तपास सुरू केला असता, रेल्वे पोलीस चोराचा शोध घेत आहे.
हे ही वाचा : कलात्मक राजयोगामुळे 'या' राशीतील लोकांचे चमकेल नशीब, काही राशीतील लोकांना शेअरबाजार, लॉटरीतून चांगला परतावा मिळणार
मुंबई लोकलमध्ये मोबाईल चोरी रोखण्यासाठी सरकारी रेल्वे पोलीस नेहमीच तत्पर असते. मात्र, लोकलमधील वाढत्या या चोरीमुळे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
ADVERTISEMENT
