Mumbai Crime: मुंबईतील मालाड येथे एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. एका 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचं बळजबरीने लिंग बदलाची शस्त्रक्रिया करण्यासाठी ब्रेनवॉश करून त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची माहिती आहे. आरोपींनी पीडित तरुणासोबत अश्लील कृत्य करत असल्याचा व्हिडीओ बनवला आणि त्या व्हिडीओच्या आधारे त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे मागण्यास सुरूवात केली. संबंधित प्रकरणासंदर्भात मालवणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. तक्रारीच्या आधारे, आरोपीवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास केला असता कांदिवली क्राइम ब्रांच युनिटने चार आरोपींना अटक केली असून उर्वरित तीन आरोपींचा शोध घेण्यास सुरू आहे. संबंधित प्रकरणातील आरोपींची नावे भास्कर शेट्टी, कावेरी निकम, नादिरा शेख उर्फ नवाज आणि माही खान असल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
लिंग बदलण्यासाठी दबाव
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रकरणातील पीडित तरुण कुरार गाव परिसरात त्याच्या कुटुंबासह राहत असून तो एका प्रतिष्ठित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची आरोपींशी ओळख झाली. कालांतराने, त्यांनी पीडित तरुणावर स्वत:च्या फायद्यासाठी ब्रेनवॉश करायला सुरुवात केली, प्रत्येक वेळी त्याच्यावर लिंग बदलण्यासाठी दबाव आणला. यासाठी तरुणाने नकार दिल्यावर आरोपींनी त्याला धमकी देण्यास सुरूवात केली. पीडित तरुणाच्या म्हणण्यानुसार, एके दिवशी आरोपींनी तरुणाला बळजबरीने मालवणी येथे एका घरात नेलं आणि त्याचं मानसिक शोषण केलं. इतकेच नव्हे तर, पीडित तरुणाला कुत्र्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आलं. आरोपींनी या घटनेचा अश्लील व्हिडीओ बनवून पीडित तरुणाच्या आईला पाठवला आणि तिच्याकडून 30 हजार रुपये वसूल केले.
हे ही वाचा: साताऱ्यात निवृत्त सैनिकाने केला शेतमजुराचा खून, मृतदेह घरामागे जाळला, 6 महिन्यांनंतर कसं समोर आलं सत्य?
बळजबरीने रुग्णालयात नेलं अन्...
‘एफआयआर’नुसार, घटनेच्या काही दिवसांनंतर आरोपी पीडित विद्यार्थ्याला बळजबरीने सुरतमधील एका रुग्णालयात घेऊन गेले आणि त्याला जबरदस्तीने वैद्यकीय कागदपत्रांवर स्वाक्षरी करायला लावली. त्यावेळी, आरोपींनी पीडित तरुणावर लिंग बदलासाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी दबाव आणला. दरम्यान, विद्यार्थ्याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला मालवणी येथे आणण्यात आलं. तिथे त्याला ओलीस ठेवून त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. दरम्यान, 13 नोव्हेंबर रोजी, पीडित तरुणाने संधी साधून आरोपींच्या तावडीतून पळ काढला आणि घरी पोहोचल्यानंतर त्याने संपूर्ण घटना त्याच्या आईला सांगितली.
हे ही वाचा: धुळे : पेढ्यातून गुंगीचे औषध दिलं, मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार, व्हिडीओ व्हायरल करतो म्हणत 60 लाख उकळले
हे ऐकून पीडित तरुणाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. संबंधित घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला आणि यामधील चार आरोपींना अटक केली. स्थानिक न्यायालयाने अटक झालेल्या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. या टोळीत अशाच घटनांमध्ये सहभागी असलेले इतर लोक असू शकतात असा पोलिसांना संशय आहे. सध्या, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











