साताऱ्यात निवृत्त सैनिकाने केला शेतमजुराचा खून, मृतदेह घरामागे जाळला, 6 महिन्यांनंतर कसं समोर आलं सत्य?
Satara Crime : साताऱ्यात निवृत्त सैनिकाने केला शेतमजुराचा खून, मृतदेह घरामागे जाळला, 6 महिन्यांनंतर कसं समोर आलं सत्य?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
साताऱ्यात निवृत्त सैनिकाने केला शेतमजुराचा खून, मृतदेह घरामागे जाळला
6 महिन्यांनंतर कसं समोर आलं सत्य?
Satara Crime : सातारा तालुक्यातील निनाम पाडळी परिसरात सहा महिन्यांपूर्वी घडलेली एक भयावह घटना अखेर समोर आली आहे. गावातील 43 वर्षीय शेतमजूर राहत्या घरातून बेपत्ता झाल्यानंतर त्याचा शोध लागला नाही. मात्र पोलिसांच्या तपासातून त्याचा खून झाल्याचे उघड झाल्याचे समोर आले आहे. हा खून गावातच राहणाऱ्या एका माजी सैनिकाने केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक करून या प्रकरणाची अधिक माहिती मिळवण्यास सुरुवात केली आहे.
शेतमजूर बेपत्ता झाल्याची नोंद, पण मागे होता खुनाचा थरार
संभाजी बाळू शेलार (वय 43) हे या गावात मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. 8 जून 2025 रोजी ते अचानक गायब झाले. कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी शोध घेतला पण त्यांचा काहीच मागमूस न लागल्याने बोरगाव पोलीस ठाण्यात त्यांची बेपत्ता नोंद करण्यात आली होती. सुरुवातीला हा साधा बेपत्ता होण्याचा प्रकार असल्याचे पोलिसांना वाटत होते. परंतु काही दिवसांनंतर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीमुळे प्रकरणाचा पूर्णतः वेगळाच पैलू समोर आला.
माजी सैनिकावर संशय; पोलिसांनी घेतली चौकशी
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर भरत ऊर्फ मधू रंगराव ढाणे (वय 48) या माजी सैनिकावर संशय उपस्थित झाला. त्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या ढाणे याने अखेर पोलिसांच्या कड्या चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. शेलार यांचा खून स्वतःने केल्याचे त्याने मान्य केले.
हेही वाचा : धुळे : पेढ्यातून गुंगीचे औषध दिलं, मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार, व्हिडीओ व्हायरल करतो म्हणत 60 लाख उकळले










