धुळे : पेढ्यातून गुंगीचे औषध दिलं, मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार, व्हिडीओ व्हायरल करतो म्हणत 60 लाख उकळले
Dhule Crime : धुळे : पेढ्यातून गुंगीचे औषध दिलं, मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार, व्हिडीओ व्हायरल करतो म्हणत 60 लाख उकळले
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
धुळे : पेढ्यातून गुंगीचे औषध दिलं, मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार
व्हिडीओ व्हायरल करतो म्हणत 60 लाख उकळले
Dhule Crime : धुळे शहरात महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून, त्या कृत्याचा व्हिडिओ चित्रीत करत तब्बल 60 लाखांच्या आसपास रक्कम उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेने शुक्रवारी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला ताब्यात घेतले आहे. सुकलाल रामभाऊ बोरसे (वय 53, रा. विवेकानंदनगर, देवपूर) असे आरोपीचे नाव आहे.
ओळखीचा गैरफायदा घेत भयंकर कृत्य
तक्रारीनुसार, बोरसे आणि पीडित महिलेची ओळख काही काळापूर्वी झाली होती. आर्थिक अडचणींमध्ये बोरसे याने मदत केली आणि त्यातून त्यांच्या संपर्कात वाढ झाली. याच जवळीकपणाचा फायदा घेऊन 17 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास बोरसे याने महिलेला पेढ्यातून आणलेले गुंगीचे औषध दिले. औषधाचा परिणाम झाल्याने महिला बेशुद्ध पडली आणि त्या अवस्थेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याच वेळी बोरसे याने संपूर्ण घटना आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड केली.
हेही वाचा : '..मी कट्टर भाजपची', पुरस्कार मिळताच मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य, आता किशोरी पेडणेकर म्हणाल्या...
व्हिडिओचा वापर करून ब्लॅकमेलिंग
अत्याचारानंतर आरोपीने व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देत पीडितेला आर्थिकदृष्ट्या त्रास देणे सुरू केले. त्याच्या धमक्या आणि दबावामुळे पीडितेला वेळोवेळी मोठी रक्कम देण्यास भाग पाडण्यात आले. या पद्धतीने आरोपीने सुमारे 59 लाख 99 हजार 400 रुपये घेऊन पीडितेची आर्थिक लूट केली. केवळ पैसेच नाही, तर धमकी कायम ठेवण्यासाठी बोरसे याने तिच्या सहीचे पाच ते सहा ब्लँक चेकही स्वतःकडे घेतले.










