Thane news : ठाण्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. रविवारी रात्री एकाच कुटुंबातील पाच सदस्यांची प्रकृती बिघडली. त्यात 3 वर्षाच्या मुलीचाही समावेश होता. इतर चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक माहितीनुसार, रुग्णालयतील तपासानंतर फूड प्पॅाइजिनिंग झाल्याचं समजतंय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 12 वर्षानंतर गुरु आणि मंगळ ग्रहाची युती, 13 सप्टेंबरपासून काही राशींतील लोकांच्या भाग्याचे उघडणार दरवाजे, काय सांगतं राशीभविष्य?
चिकनसोबत उकडलेली अंडीससह वडापाव
प्रसारमाध्यमाने सांगितलं की, लहान मुलीचे वडील राविवारी रात्री चिकन घेऊन घरी आले होते. त्यानंतर त्यांनी त्यांनी घरात चिकन बनवले आणि रात्री जेवताना चिकनसोबत उकडलेली अंडीससह वडापाव खाल्ले. जेवणानंतर काही वेळानंतर कुटुंबातील महिला, तीन मुली आणि एका मेहुण्याला उलटी झाली असत, पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या होत्या. परिस्थिती पाहून कुटुंबियांनीच पाचही जणांना रुग्णालयात नेले, मात्र तीन वर्षाच्या लहान मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
मृत्यूचं कारण आलं समोर
भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस जितेंद्र कांबळे यांनी सांगितलं की, लहान मुलीच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यात आलं. ज्यामध्ये मृत्यूचं कारण फुड प्वॅाइजनिंग झाल्याचं सांगितलं. घरात बनवण्यात आलेलं जेवण फॉरेन्सिक लॅबकडे तपासासाठी नेले होते. संबंधित प्रकरणात अकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : Pune: आयुष कोमकरच्या शरीरात सापडल्या 9 गोळ्या, मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आजोबानेच नातवाला संपवलं? चक्रावून टाकणारी स्टोरी!
वरिष्ठ पोलीस अधिकारी कांबळे म्हणाले की, बाजारातून आणलेल्या वस्तूत विषारी पदार्थ होते. आता विश्लेषणात्मक अहवाल आल्यानंतरच नेमकं कारण स्पष्ट होईल. या घटनेमुळे परिसरात एकच घबराट पसरली आहे. यानंतर आता पोलिसांनी नागरिकांना खाण्या पिण्याबाबत सावधगिरी बाळगण्यास सांगितली आहे. संशयास्पद लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा.
ADVERTISEMENT
