Thane Crime: ठाण्यातून पोलिसांनी अपहरणाची धमकी देऊन पैसे मागितल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका स्कूल बस चालकाला अटक केल्याची बातमी समोर आली आहे. आरोपी बस चालकावर स्कूल बसमधून प्रवास करणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थ्याचं अपहरण करून त्याच्या पालकांकडून तब्बल 4 लाख रुपये पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
अज्ञात नंबरवरून टेक्स्ट मॅसेज
पोलिस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी या प्रकरणाबाबत बोलताना सांगितलं की, आरोपी बस चालक ठाणे जिल्ह्यातील काशिमिरा येथे मोबाईल फोन आणि सिम कार्डचे दुकान चालवत होता. मात्र, भरपूर पैसे मिळण्याच्या नादात त्याने एक योजना आखली. काशिमिरा येथील रहिवासी असलेल्या एका मुलाच्या आईला शनिवारी एका अज्ञात मोबाइल नंबरवरून टेक्स्ट मॅसेज मिळाला. त्यामध्ये, 4 लाख रुपये न दिल्यास मुलाचं अपहरण करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर, त्यांनी लगेच स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला.
ड्रायव्हरचं मोबाईल आणि सिम कार्डचं दुकान
तपासादरम्यान, हा मॅसेज स्थानिक मोबाईल फोन दुकानाशी संबंधित एका नंबरवरून ट्रेस केला. आरोपी स्कूल बस ड्रायव्हरचे मोबाईल आणि सिम कार्डचं दुकान असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्याने त्याच्या एका अशिक्षित ग्राहकाचं सिम कार्ड घेतलं आणि ते एका निष्क्रिय सिम कार्डने बदललं.
व्हाट्सअॅपद्वारे धमक्या पाठवल्या
त्यानंतर आरोपी ड्रायव्हरने त्याच सिम कार्डचा वापर करून मुलाच्या कुटुंबियांना व्हाट्सअॅपद्वारे धमक्या पाठवल्या. त्याने खंडणीच्या मॅसेजमध्ये मुलाचा फोटो देखील पाठवला होता, अशी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यांनंतर पोलिसांनी 37 वर्षीय बस चालक हरिराम सोमा याची चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि रविवारी त्याला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हे ही वाचा: प्रियकराच्या प्रेमात पत्नी झाली बेवफा... दोन मुलांना सोडून गेली पळून अन् अॅडव्होकेट पतीने उचललं टोकाचं पाऊल!
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी मुलाला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, याची खात्री केली आहे. तक्रार मिळाल्यानंतर काही तासांतच पोलिसांच्या टेक्निकल पथकाने डिजिटल ट्रेलचा शोध घेतला आणि संशयिताची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
हे ही वाचा: शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची देवेंद्र फडणवीसांनी चौकशी लावली, नेमकं प्रकरण काय?
आरोपीवर भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हेगारी धमकी आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पोलिसांना अशी माहिती मिळाली आहे की आरोपीने त्याच्या बसमधून शाळेत नेणाऱ्या इतर मुलांना लक्ष्य केलं. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











