20 दिवसांपूर्वीच विकत घेतली थार, ताम्हिणी घाटातील 500 फूट खोल दरीत कोसळली, भीषण अपघातात चौघांवर काळाचा घाला

Pune Tamhini Ghat Accident : पुण्याहून कोकणाकडे जाताना रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात एक भीषण अपघात झाला. या अपघातात काळ्या रंगाची थार गाडी ताम्हिणी घाटातील 500 फूट खोल दरीत कोसळली आणि याच दुर्घटनेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Pune Tamhini Ghat Accident

Pune Tamhini Ghat Accident

मुंबई तक

• 06:03 PM • 20 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

ताम्हिणी घाटात भीषण अपघात 

point

500 फूट खोल दरीत कोसळली कार

point

चौघांचा मृतदेह ताब्यात, दोन अद्यापही बेपत्ता

point

धक्कादायक कारण समोर

Pune Tamhini Ghat Accident : पुण्याहून कोकणाकडे जाताना रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात एक भीषण अपघात झाला. या अपघातात काळ्या रंगाची थार गाडी ताम्हिणी घाटातील 500 फूट खोल दरीत कोसळली आणि याच दुर्घटनेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच, घटनास्थळी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था आणि रेस्कू पथक दाखल झाले. हा भीषण अपघाताची माहिती 19 नोव्हेंबर रोजी मंगळवारी समोर आली. केवळ 20 दिवसांपूर्वीच ही कार विकत घेतली होती, पण काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि अनर्थ घडला.

हे वाचलं का?

हे ही वाचा : पत्नीच्या कोल्ड ड्रिंकमध्ये पती मिसळायचा नशेचे पदार्थ, रात्री मित्रांना बोलावून तिच्यासोबत... तिचं आयुष्य बनलं नर्क

ताम्हिणी घाटात भीषण अपघात 

रायगड़ जिल्ह्यातील ताम्हिणी घाटातील 500 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. महत्त्वाची बाब म्हणजे अशी की, या कारला विकत घेऊन अवघे 20 दिवस पालटून गेले होते. ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला होता. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे. 

चौघांचा मृतदेह ताब्यात, दोन अद्यापही बेपत्ता

या अपघातात बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्याच नातेवाईकांची चौकशी केली असता. त्यांचे लोकेशन रायगड आणि पुणे या जिल्ह्यांना जोडलेल्या ताम्हिणी घाटात सापडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर शोधमोहिम सुरु केली असता, चौघांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. पण, यात अजून दोन जणांचे मृतदेह बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच सह्याद्रीकडे वन्यजीव सामाजिक संस्थेच्या रेस्क्यू टीमकडून अपघातातील बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध घेणं सुरु आहे. 

हे ही वाचा : लोकलमध्ये हिंदी बोलणं जीवावर बेतलं, मराठी तरुणाला मराठी लोकांकडूनच मारहाण; आत्महत्येने झाला शेवट

या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास करण्यास सुरुवात केली. या अपघाताचे कारण शोधण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत. ड्रायव्हरचा गाडीवरून ताबा सुटल्याने कार दरीत कोसळ्याचे सांगण्यात येत आहे. 

    follow whatsapp