इंद्रायणी नदीला पूर, आळंदी शहरातील पूल पाण्याखाली; गावातील घरे बुडाली

मुंबई तक

• 07:23 PM • 06 Jul 2026

Indrayani River Flood : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीला पूर आला आहे. नदी दुथडी भरून वाहत असून नदीच्या परिसरातील गावांतील काही घरे पाण्याखाली गेली आहेत. आळंदीत प्रवेश करताना असलेले चारही पूल पाण्याखाली गेले आहेत.

Indrayani River Flood

Indrayani River Flood

Google CTA

बातम्या हायलाइट

point

इंद्रायणी नदीला पूर

point

भावडी गावातील कदमवस्ती परिसरातील काही घरे पाण्याखाली

point

आळंदीतील चारही पूल पाण्याखाली

Indrayani River Flood : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीला पूर आला आहे. नदी दुथडी भरून वाहत असून नदीच्या परिसरातील गावांतील काही घरे पाण्याखाली गेली आहेत. तसेच आळंदीत प्रवेश करताना असलेले चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. परिस्थिती बघता, आळंदी शहरात प्रवेश करणं सुरक्षित नाही. यासाठी सर्व वारकरी भाविकांनी सुरक्षेचं आवाहन केले आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नाशिकमध्ये उद्या होणार प्रचंड मोठी ढगफुटी; CM फडणवीसांनी स्वत:च दिली माहिती, रेड अलर्ट जारी!

भावडी गावातील कदमवस्ती परिसरातील काही घरे पाण्याखाली

 

नदीला पूर आल्याने परिसरातील वाघोली जवळील भावडी गावातील कदमवस्ती परिसरातील काही घरे पाण्याखाली गेली आहेत. 25 ते 30 लोक आणि काही जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली आहेत. स्थानिकांनी काळजी घ्यावी असं स्थानिक प्रशासनानं आवाहन केलं आहे. 

नदीजवळच्या भावडी मरकड रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ता बंद

अशातच, नदीजवळच्या भावडी मरकड रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ता बंद करण्यात आलेला आहे. याच ठिकाणी खड्डा आढळून न आल्याने डंबर पलटी झाल्याची घटना घडली आहे. 

हे ही वाचा : महाबळेश्वरच्या वेण्णा नदीवरील पूल कोसळला, पर्यटक अडकले, नागरिकांची दाणादाण

स्थानिक प्रशासनाने आपल्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती उपायोजनेचं काम सक्रिय ठेवलं आहे. सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे. पोलीस यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.