Ketan Agrawal Murder Case : लग्न जुळलं तरीही चेतनला सहा महिन्यांपासून 2004 फोन कॉल्स अन्..

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवालच्या हत्येनंतर देशभर एकच खळबळ माजली आहे. केतन हत्या प्रकरणातून आता अनेक धागेदोरे समोर येऊ लागले आहेत. केतन आणि सियाचं लग्नापूर्वी चांगली बाँडिंग तयार झाली होती, ती केतनच्या घरी ये-जा करायची, पण सर्व व्यवस्थित सुरू असताना तिचे चेतन नावाच्या तरुणाशी असंख्य फोन कॉल्स कसे सुरू होते, हे तपासाचं प्रकरण आहे.

Ketan Agrawal Murder Case

Ketan Agrawal Murder Case

मुंबई तक

• 08:10 PM • 25 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

सहा महिन्यांपासून चेतनला 2 हजार 4 फोन कॉल्स

point

लग्न ठरलेलं असताना दुसऱ्या तरुणाशी असंख्यदा फोन कॉल्स कशासाठी?

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवालच्या हत्येनंतर देशभर एकच खळबळ माजली आहे. केतन हत्या प्रकरणातून आता अनेक धागेदोरे समोर येऊ लागले आहेत. नुकताच वाढदिवशी मिठी मारतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.  त्या व्हिडिओत केतन आणि सिया दोघेही आनंदी दिसत आहेत, मग अचानक सियाने होणारा नवरा केतनसोबत असं हैवानी कृत्य का केलं असा प्रश्न उपस्थित होतोय. हाच विषय चर्चेचा बनला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : कल्याण: टोमॅटोचा बहाणा, 55 वर्षीय वृद्धानं 7 वर्षीय चिमुरडीला बंद दारआड..

सहा महिन्यांपासून केतनला 2004 फोन कॉल्स

सिया गोयलने केलेल्या कृत्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, पुण्यातील एका श्रीमंत घरातील व्यवसायिक असलेल्या कुटुंबात तिचा विवाह ठरवला होता. मात्र, दुसरीकडे तपास यंत्रणांना असे काही पुरावे हाती लागले, ज्यामुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. चेतन चौधरीच्या सतत संपर्कात असलेली सिया गोयलने सहा महिन्यांपासून चेतनशी 2004 फोन कॉल्स झाले होते. 

केतन अग्रवाल हे पुण्यातील एका प्रतिष्ठित व्यवसायिक कुटुंबातील होते. त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसायिक संचालक आणि मुख्य विपणन अधिकारी म्हणून कार्यरत होता. कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या सदन होते. कुटुंबियांच्या म्हणण्यांनुसार नोव्हेंबर महिन्यात मोठा विवाह सोहळ्याची तयारी करण्यात आली. कुटुंबीयांच्या मते, प्री-वेडिंग शूटपासून ते प्रत्यक्षपणे लग्नापर्यंतचे कार्यक्रम अविस्मरणीय व्हावा असे नियोजन करण्यात आले होते. तसेच एकूण 40 खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. दोन्ही कुटुंबे भविष्याची स्वप्ने रंगवू लागली होती, मात्र, पोलीस तपासातून भयंकर चित्र समोर आलं. 

लग्न ठरलेलं असताना दुसऱ्या तरुणाशी असंख्यदा फोन कॉल्स कशासाठी?

पोलीस आणि स्थानिकांच्या माहितीनुसार, चेतन चौधरीचा देखील पुण्यात व्यवसाय आहे. त्याने बीबीएचे शिक्षण सुरू केलं, मात्र ते पूर्ण केलं नाही. शहरात त्याचे एक दुकानआहे. अशातच आता सियाच्या आयुष्यात नेमकं काय सुरूये याबाबत चर्चेला तोंड फुटलं आहे. लग्न ठरलेलं असताना दुसऱ्या तरुणाशी असंख्यदा फोन कॉल्स कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होतोय. 

कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कुटुंबे ही 19 फेब्रुवारी रोजी एकमेकांना भेटली होती. नंतर सिया केवळ होणारी बायकोच राहिली नव्हती, तर कुटुंबाचा एक भाग बनली होती. ती केतनच्या अनेकदा घरी भेटीस गेली होती. तिच्या वागण्यावरून तिला केतनबाबत कधीच अस्वस्थ वाटलं नाही. मात्र केतनची हत्या केल्यानं कुटुंबियांना मोठा हादरा बसला आहे. 

सोशल मीडियासमोरील आलेल्या रोका सोहळ्याच्या व्हिडिओंनी देखील लक्ष वेधून घेतलं. व्हिडिओत केतन आणि सिया दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. अंगठीच्या सोहळ्यापासून अगदी शेवटपर्यंत ती अग्रवाल कुटुंबाशी मिळून मिसळून होती. पण, काही व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा होऊ लागली आहे. नात्याबाबत संभ्रम देखील निर्माण झाला, तेव्हा तो संभ्रम स्पष्ट का केला नाही, असा प्रश्न निर्माण झाला. 

अशातच 17 जून रोजी सिया आणि चेतन लुलनगर येथील एका कॅफेत भेटले होते. तपास यंत्रणांचा दावा असा की, या भेटीचा संबंध घटनेशी देखील असू शकतो. लोहगड किल्ल्याची माहिती आधीच शोधून काढण्यात आली होती. तपास यंत्रणा प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न करत आहे. संबंधित प्रकरणातील कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. आलेली वेळ आणि दोघेही जात असलेल्या वेळेत 48 मिनिटांचा कालावधी होता. पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे असे की, घटनेच्या वेगवेगळ्या आवृत्त्या आता समोर आल्या आहेत. तपास यंत्रणा तपास करण्याचा प्रयत्न करत आहे. 

हे ही वाचा : सातारा: शेळीला वाचवायला गेलेल्या नातवाला विजेचा झटका, आजी वाचवायला गेली अन्..

दरम्यान, वडगाव न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अशातच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं की, प्रकरणातील अनेक बाबींचा लवकर तपास करून पुराव्यांची शाहनिशा केली जाईल. अशातच पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.