मुंबई-पुणे महामार्ग दोन दिवस 'एवढे' तास राहणार बंद, 'या' पर्यायी मार्गांचा करा वापर

Mumbai-Pune Highway : मुंबई-पुणे महामार्ग अर्थातच यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग काही तासांसाठी बंद राहणार आहे. याच महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बाब आहे. डोंगरगाव आणि कुसगाव दरम्यान बांधण्यात आलेल्या पुलाचे शटरिंगचे काम काढणे आणि रंगकाम सुरु असल्याने महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

Mumbai-Pune Highway

Mumbai-Pune Highway

मुंबई तक

22 Apr 2026 (अपडेटेड: 22 Apr 2026, 08:10 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई-पुणे महामार्ग दोन दिवस 'एवढे' तास राहणार बंद

point

'या' पर्यायी मार्गांचा करा वापर

पुण्याची गोष्ट : मुंबई-पुणे महामार्ग अर्थातच यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग दोन दिवस काही तासांसाठी बंद राहणार आहे. याच महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बाब आहे. डोंगरगाव आणि कुसगाव दरम्यान बांधण्यात आलेल्या पुलाचे शटरिंग काढण्याचे काम आणि रंगकाम सुरु असल्याने महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे. या कामासाठी 23 एप्रिल 24 एप्रिल 2026 या दोन दिवशी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत वाहतूक सेवा बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणे: लग्न जुळत नसल्याने तरुणाने पोलीस असल्याचा केला खोटा दावा, शहरभर अभिनंदनाची बॅनरबाजी; पितळ उघडं पडलं

'या' पर्यायी मार्गांचा करा वापर 

या समस्येमुळे दोन दिवस मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना तसेच वाहनचालकांसाठी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच इतर सर्व वाहने किवळे-देहूरोड-तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून कुसगाव टोलनाका येथे वळण्यात येऊ शकतात. 

तसेच पुण्याकडे येणारी वाहतूक 24 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बंद करण्यात येईल. दरम्यान, पुढील वाहने कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय 48 वरून देहू रोड-किवळे मार्गे पुण्याकडे वळवण्यात येणार आहेत. अशातच वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल. 

हे ही वाचा : वाहतूक कोंडीमुळे संतापलेल्या 'त्या' महिलेबाबत गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?

प्रवासादरम्यान मदतीसाठी संपर्क 

अशातच प्रवासादरम्यान काही तांत्रिक बाबींमुळे अडचण निर्माण झाल्यास प्रशासनाने पुढील नियंत्रण कक्षाला संपर्क साधून मदतीची मागणी करावी. MSRDC नियंत्रण कक्ष : 9822498224, महामार्ग पोलीस विभाग : 9833499833