पुण्याची गोष्ट : पुणेकरांनो हित साधून घ्या, मेट्रो 2 ची प्रतिक्षा लवकरच संपणार, महत्त्वाची अपडेट समोर

Pune News : पुणे शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होताना दिसतेय. मात्र, या वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटवण्यासाठी पुणेकरांच्या हिताची एक बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचा विस्तार वेगाने होणार असल्याची माहिती समोर आली.

Pune news

Pune news

मुंबई तक

• 07:24 PM • 21 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटवण्यासाठी पुणेकरांच्या हिताची बातमी समोर

point

चांदणी चौक स्थानक थेट राष्ट्रीय महामार्गाशी जोडणार 

पुण्याची गोष्ट : पुणे शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होताना दिसतेय. मात्र, या वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटवण्यासाठी पुणेकरांच्या हिताची एक बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचा विस्तार वेगाने होणार असल्याची माहिती समोर आली. ज्यात वनाझ ते रामवाडी या मेट्रो मार्गात वनाझ ते चांदणी चौक हा अतिशय महत्त्वाच्या टप्प्यात येणार आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणे: लग्न जुळत नसल्याने तरुणाने पोलीस असल्याचा केला खोटा दावा, शहरभर अभिनंदनाची बॅनरबाजी; पितळ उघडं पडलं

महामेट्रो प्रकल्पाचा निर्णय 

महामेट्रो हा प्रकल्प टी अँड टी इन्फ्रा आणि युनिव्हास्तू इंडिया या पुणे शहरातील कंपन्यांच्या एकत्रित उपक्रमासंबंधित आहे. याच कामाअंतर्गत सुमारे दीड किमी अंतर लांबीचा उन्नत मेट्रो मार्ग उभारला जाईल. याच मार्गावर कोथरूड आणि चांदणी चौक परिसरात दोन नवीन बस स्थानके बांधली जातील. 

अशातच नव्या कनेक्टिव्हिटीमुळे कोथरूड, बावधन आणि चांदणी चौक परिसरातील रहिवाशांना मेट्रोची सुविधा अधिक सोयीची असेल. याच भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. पण, यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास दूर होण्यास मदत होईल. मेट्रो सुरु झाल्यानंतर रस्त्यांवरील गर्दी कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. 

चांदणी चौक स्थानक थेट राष्ट्रीय महामार्गाशी जोडणार 

संबंधित प्रकल्पात केवळ प्रवाशांना मेट्रो मार्गच नाही, तर इतर सुविधा देखील मिळणार आहेत. कोथरूड डेपो चौकात दोन मजली नळस्टॉप उड्डाणपूल बांधला जाईल. ज्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचा मार्ग मोकळा होईल, या माहितीची निश्चिती करण्यात येत आहे. 

हे ही वाचा :'मी 1967 मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून...', प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांची सुनेत्रा पवारांसाठी पोस्ट

कामासाठीचा कालावधी जाहीर 

दरम्यान, चांदणी चौक मेट्रो स्थानकाला थेट राष्ट्रीय 48 शी पादचारी पूल तयार करण्यात येणार आहे. या पूलामुळे प्रवाशांना चांगला फायदा होईल आणि कनेक्टिव्हिटी वाढेल. महत्त्वाची बाब म्हणजे हे काम पूर्ण करण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधीचा अवधी लागण्याची शक्यता आहे.