'मी 1967 मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून...', प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांची सुनेत्रा पवारांसाठी पोस्ट

मुंबई तक

Sharad Pawar Facebook Post : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेसबुक पोस्ट करत सूनेत्रा पवार यांना मतदान करण्याचं आवाहन केलंय.

ADVERTISEMENT

Sharad Pawar Facebook Post
Sharad Pawar Facebook Post
google news

बातम्या हायलाइट

point

'मी 1967 मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून...'

point

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांची सुनेत्रा पवारांसाठी पोस्ट

Sharad Pawar Facebook Post : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर होत असलेल्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा आज (दि.21) शेवटचा दिवस आहे. दरम्यान, खासदार शरद पवार यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून शरद पवार यांनी सूनेत्रा पवार यांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. ते काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात.. 

हेही वाचा : 36 वर्षीय लेकाने 70 वर्षीय आईचे हातपाय बांधून केलं लैंगिक शोषण, रात्रभर तिथेच... लाज आणणारा प्रकार

शरद पवारांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी 

मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता २०२६ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे, हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंत:करणाने सांगू इच्छितो. माझ्यावर अथक प्रेम व विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार व कार्यकर्ते मला समजुन घेतील याची मी खात्री बाळगतो.  आमच्या पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार) या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहिर केला आहे. स्व. अजित पवार यांना ही एकप्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी. बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलेला आहे. ते या आवाहनास प्रतिसाद देतील, असा मला विश्वास आहे. मतदानासाठी प्रत्यक्ष न येता निवडणुक आयोगाच्या विविध पर्यायांचा देखील मी तपास केला व विचारणा केली. परंतु ते पर्याय उपलब्ध नसल्याचे राज्याच्या निवडणुक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अखेर अतिशय व्यथित व जड अंत:करणाने मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय करावा लागला. या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करावे, असे मी बारामतीकरांना पुन्हा एकदा आवाहन करतो.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

हे वाचलं का?