'नारी शक्ती आणि संविधानावर काँग्रेसकडून अन्याय' मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका, नेमकं काय म्हणाले?
देशातील नारी शक्ती आणि संविधानावर काँग्रेसने अन्याय केल्याचा आरोप मोदींनी केला. ते म्हणाले की, 'काँग्रेस एखाद्या परजीवीप्रमाणे प्रादेशिक पक्षांच्या जीवावर जगत आहे आणि ती त्यांनाही बुडवेल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'नारी शक्ती आणि संविधानावर काँग्रेसकडून अन्याय'
मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका,
नेमकं काय म्हणाले?
PM Modi On Congress : संसदेत परिसीमन विधेयक नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (18 एप्रिल) देशाला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागले. देशातील नारी शक्ती आणि संविधानावर काँग्रेसने अन्याय केल्याचा आरोप मोदींनी केला. ते म्हणाले की, 'काँग्रेस एखाद्या परजीवीप्रमाणे प्रादेशिक पक्षांच्या जीवावर जगत आहे आणि ती त्यांनाही बुडवेल.' यावेळी मोदी नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.
संविधान आणि नारीशक्तीवर अन्याय
संसदेत नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपकडून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल सुरु आहे. अशातच मोदींनी याविषयी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, 'काँग्रेस एखाद्या परजीवीप्रमाणे प्रादेशिक पक्षांच्या जीवावर जगत आहे आणि ती त्यांनाही बुडवेल काँग्रेस दरवेळी तीच तीच कारणे सांगते. घराणेशाही चालवणारे पक्ष महिलांचे हित सोडू शकत नाहीत.' पंतप्रधानांनी असा आरोप केला की, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी हा प्रामाणिक प्रयत्न रोखला आणि देशासमोर तो संपवून टाकला. ते पुढे म्हणाले की, "या पक्षांनी देशाची नारीशक्ती आणि संविधान या दोघांवरही अन्याय केला आहे.'
कामात दिरंगाई करणे ही काँग्रेसची कार्यसंस्कृती
मोदी म्हणाले की, 'देशासाठी आवश्यक असणारा कोणताही महत्त्वाचा निर्णय असो, काँग्रेस तो नेहमी दडपून टाकते. काँग्रेसच्या याच वृत्तीमुळे आज देश त्या उंचीवर पोहोचू शकलेला नाही, ज्याचा तो खरोखर हक्कदार आहे.' काँग्रेसवर टीका करताना ते पुढे म्हणाले की, 'काँग्रेस प्रत्येक सुधारणेला (रिफॉर्मला) विरोध करून किंवा ती रोखून धरून बसली आहे. कामात दिरंगाई करणे आणि ते लटकवून ठेवणे हेच काँग्रेसचे तत्व आणि कार्यसंस्कृती राहिली आहे.'
'एनडीएसाठी ब्लॅक डे'
दरम्यान, महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजप परिसीमन करुन दक्षिण आणि उत्तर भारतातील भेदग वाढवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. संसदेत हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर आज सकाळी प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि एनडीएवर टीकास्त्र डागले होते. विधेक नामंजूर झाला तो दिवस एनडीएसाठी ब्लॅक डे असल्याचं त्या म्हणाल्या होत्या.









