PM मोदी जेव्हा-जेव्हा देशाला संबोधित करतात तेव्हा-तेव्हा... आजही देणार आश्चर्याचा मोठा धक्का?
PM Modi To Address Nation: महिला आरक्षण विधेयक हे लोकसभेत संमत न झाल्याने राजकीय वातावरण बरंच तापलं आहे. अशावेळी पंतप्रधान मोदी देशवासियांना संबोधित करणार आहे. पण या संबोधनात ते देशातील नागरिकांना काही आश्चर्याचा धक्का देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (18 एप्रिल) रात्री 8.30 वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. 2026 मधील हे त्यांचे पहिलेच संबोधन असेल. महिला आरक्षण विधेयक लोकसभेत पारित न झाल्याने मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. याच सुरू असलेल्या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हे बोलणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनुसार, मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान त्यांनी विरोधी पक्षांवर महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देण्याचा आणि महिलांच्या हक्कांच्या विरोधात काम करण्याचा आरोप केला. त्यामुळे आपल्या आजच्या संबोधनात तेच याच मुद्द्यावर बोलण्याची शक्यता अधिक असल्याचं मानलं जात आहे.
मात्र, असं असलं तरी पंतप्रधान मोदींच्या मनात नेमकं काय चाललंय हे कुणालाही सांगता येणार नाही. कारण याआधी अनेकदा मोदींना आपल्या संबोधनातून देशवासियांना आश्चर्याचे धक्के दिले आहेत. त्यामुळे आज देखील ते असाच काही आश्चर्याचा धक्का देणार का? अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पाहा आतापर्यंत कितीदा राष्ट्राला संबोधित करताना PM मोदींनी दिलाय आश्चर्याचा धक्का
अचानक संबोधन करण्याची परंपरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा अचानक राष्ट्राला संबोधित केले आहे. या संबोधनांमधून अनेकदा आश्चर्यकारक निर्णय समोर आले आहेत, ज्यांचा अर्थव्यवस्थेपासून ते राष्ट्रीय सुरक्षेपर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम झाला आहे.









