आदित्य भवर, पुणे: महाराष्ट्रातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाईला वेग दिला आहे. कोथरूड गोळीबार प्रकरणात निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र नियंत्रण कायद्यांतर्गत (MCOCA)गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विशेष पथकं तयार केली आहेत. या पथकांनी घायवळची मुख्य स्कॉर्पिओ गाडी जप्त केली असून, त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. घायवळने अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरलेली ही 8055 नंबरची स्कॉर्पिओ गाडीवर 'BOSS' असा शब्द लिहिला होता. पोलिसांनी आतापर्यंत 4 गाड्या जप्त केल्या असून, उर्वरित गाड्यांचा शोध सुरू आहे. याशिवाय, जामखेड आणि आसपासच्या परिसरात घायवळने केलेल्या 15 ते 20 जमिनींच्या खरेदी व्यवहारांची चौकशी सुरू असून, अनधिकृत व्यवहार असल्यास कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
प्रकरणाची पार्श्वभूमी
निलेश घायवळ (वय 40 वर्ष) हा पुणे शहरातील कुख्यात गुंड असून, त्याच्याविरुद्ध 12 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. यात खून, खुनाचा प्रयत्न, वसुली, शस्त्रसाठा आणि गँगवॉरचा समावेश आहे. 2000 ते 2003 पर्यंत निलेश घायवळ हा गजा मारणे गँगमध्ये कार्यरत होता, नंतर त्याने स्वतंत्र टोळी उभी केली. 19 सप्टेंबर 2025 रोजी कोथरूड येथे घायवळच्या सहकाऱ्यांनी भर रस्त्यात एका व्यक्तीवर गोळीबार केला होता, ज्यामुळे दोन FIR दाखल झाल्या. या प्रकरणात घायवळ आणि 8 सहकाऱ्यांवर MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, 5 जणांना अटक करण्यात आली आहे. घायवळ मात्र फरार असून, तो परदेशात असल्याचे समोर आले आहे.
हे ही वाचा>> दोन तरूण पती-पत्नी म्हणून राहायचे, खोलीतून आला मुलीचा आवाज.. तरुणाने गे पार्टनरचा प्रायव्हेट पार्टच टाकला कापून!
घायवळने मामाच्या गावी ऊसतळ्यात लपवलेली स्कॉर्पिओ
पोलिसांच्या विशेष पथकाने घायवळची मुख्य स्कॉर्पिओ (MH-14 BH 8055) जप्त केली आहे. ही गाडी घायवळने अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरली होती, ज्यात वसुली आणि गोळीबाराचा समावेश आहे. गाडीवर 'BOSS' असा शब्द लिहिला होता, जो घायवळच्या अहंकारी स्वभावाचे प्रतीक आहे. ही गाडी घायवळच्या मामाच्या गावी (जामखेड तालुका, अहमदनगर जिल्हा) ऊसतळ्यात लपवून ठेवण्यात आली होती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला आणि गाडी जप्त केली. ही कारवाई घायवळच्या टोळीच्या संपत्तीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे.
पासपोर्ट रद्द: परदेशी सरकारकडून कारवाईची शक्यता
घायवळने फसवणूक करून 'तात्काळ' पासपोर्ट मिळवला असून, पोलिस व्हेरिफिकेशनदरम्यान तो 'उपलब्ध नसल्याचे' नोंदवले होते तरीही पासपोर्ट मिळाला. पुणे पोलिसांनी विशेष MCOCA कोर्टात अर्ज करून त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची विनंती केली असून, कोर्टाने तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत पुणे पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले असून, "कायद्याने गुन्हेगारांना शिस्तबद्ध करण्यासाठी कठोर पावले उचलावीत," असे म्हटले आहे. पासपोर्ट रद्द झाल्याने घायवळ ज्या देशात आहे त्या सरकारकडून त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी लुक आऊट सर्क्युलर (LOC) जारी केली आहे.
हे ही वाचा>> दोघेही OYO मध्ये असायचे, तरुणी 'त्याला' सतत बोलवायची, पण 'त्या' रात्री...
जमिनी आणि मालमत्तेची चौकशी
घायवळने जामखेड, धाराशिव आणि नगर जिल्ह्यातील आसपासच्या परिसरात 15 ते 20 जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार केले आहेत. यापैकी अनेक व्यवहार अनधिकृत आणि फसवणुकीचे असल्याचा संशय आहे. पोलिसांनी या व्यवहारांची सविस्तर चौकशी सुरू केली असून, अनधिकृत व्यवहार असल्यास रद्द करण्याची कारवाई केली जाईल. घायवळने कब्जा केलेल्या सर्व फ्लॅट्स सील केल्या आहेत, ज्यात कोथरूड येथील 10 फ्लॅट्सचा समावेश आहे. हे फ्लॅट्स वसुलीसाठी ताब्यात घेतले गेले होते, आणि त्यात भाडेकरूंकडून भाडे वसूल केले जात होते.
गाड्या आणि बँक अकाउंट्सवर कारवाई
घायवळ आणि त्याच्या टोळीच्या अनेक गाड्या आहेत, ज्या गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरल्या जात होत्या. आतापर्यंत 4 गाड्या जप्त केल्या असून, उर्वरित गाड्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी घायवळच्या घरी छापा टाकून शस्त्रे, सोने, रोख रक्कम आणि मालमत्ता कागदपत्रे जप्त केली आहेत. याशिवाय, अनेक बँक अकाउंट्समधून घायवळला पैसे मिळत असल्याचे समोर आले असून, सर्व अकाउंट्सची चौकशी सुरू आहे. हे अकाउंट्स वसुली आणि गुन्हेगारी व्यवहारांसाठी वापरले जात होते.
फरार आरोपी आणि पोलिसांची मोहीम
घायवळ टोळीतील अनेक आरोपी फरार असून, ते वॉन्टेड आहेत. पोलिसांनी अनेक पथकं तैनात केली असून, धाराशिव, नगर जिल्हा आणि जामखेड परिसरात विशेष पथकं कार्यरत आहेत. घायवळ टोळीचे अनेक लोकेशन्स ट्रेस झाले असून, सतर्कता बाळगण्यात आली आहे.
ADVERTISEMENT











