पुणे तिथं काय उणे! फिर्याद दाखल करणाऱ्यांवर कोयत्याने सपावर वार, नेमका वाद काय?

Pune Crime : एका जून्या वादातून आठ जणांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलेल्या व्यक्तीवर कोयत्याने वार केले. तसेच पुण्यातील भोसरीत बेकायदा शस्त्र वापरणाऱ्याला अटक केली.

pune crime

pune crime

मुंबई तक

15 Jul 2025 (अपडेटेड: 15 Jul 2025, 10:42 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पूर्ववैमन्यासाच्या वादातून कोयत्याने सपासप वार

point

निगडीत बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांना अटक

Pune Crime : पूर्ववैमन्यासाच्या वादातून आठ जणांनी एका व्यक्तीवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. एवढंच नाही, तर घरावर दगडफेक करत वाहनांची तोडफोडही करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (12 जुलै) रोजी रात्रीच्या पुण्यातील निगडी येथे घडली आहे. पोलिसांनी तीन हल्लेखोरांना अटक केली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे समोर आलेली आहेत. 

हे वाचलं का?

हेही वाचा : शनि आणि बुध ग्रहाची वक्री गती 'या' तीन राशीतील लोकांना आर्थिक सामना करावा लागणार, तुमच्या राशीचा समावेश आहे का?

साहिल गुलाब शेख ( वय 22 ), शंतनू सुनील म्हसुगडे ( वय 24), अविनाश भाऊ आव्हाड (वय 26) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे समोर आली आहेत. या प्रकरणात समील असलेल्या इतरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 23 वर्षीय महिलेनं निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीचे फिर्यादी महिलेचे पती आणि सोहेल जाधव यांच्यासोबत यापूर्वी भांडण झालं होतं. त्याच रागातून आरोपीने फिर्याद दाखल केलेल्या व्यक्तीच्या वडिलांवर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर पीडित फिर्यादीच्या घरावर दगडफेक केली. एकालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकीही देण्यात आली. हवेत कोयते नाचवून दहशत दाखवली. ते एवढ्यावरच न थांबता त्यांनी वाहनांची तोडफोड करत उन्माद केला. 

हेही वाचा : कोकणासह रायगड आणि रत्नागिरीत जोराचा पाऊस बरसणार, पुणे आणि साताऱ्यातील 'या' भागांत मान्सूनची स्थिती काय?

भोसरीत बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांना अटक

निगडीनंतर आता पुण्यातील भोसरीत अवैधपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोन गुंडांना पथकाने अटक केली आहे. ही कारवाई रविवारी 13 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली. बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या दोघांची ओळख पटली आहे. अजय सुखदेव माने (वय 25), सोमनाथ अंकुश पवार (वय 29) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आता समोर आलेली आहेत. या प्रकरणी पोलीस शिपाई विजय तेलेवार यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

    follow whatsapp