Pune Crime : शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होत आहे. पुण्यातील वाघोली परिसरात पहाटे खूनाचा थरार बघायला मिळाला. एका तरुणाच्या डोक्यात दगड घालत ठेचून ठार मारल्याची काळीज पिळवटून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला. आरोपीने त्याच्या तीन साथीदारांना हाताशी धरलं आणि निष्पाप तरुणाचा खून केला. या खूनात बादल खान (वय 24) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव होतं. या घटनेनं वाघोली परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : cough syrup मुळे दहा जणांचा मृत्यू, पोलीस प्रशासनाला आली जाग, डॉक्टरांना उचललं
पुण्यातील वाघोली परिसरात काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली परिसरात असलेल्या उबाळेनगर परिसरात उबाळेनगर परिसरात कृष्णा लॉजसमोर पहाटे साडे तीन वाजेच्यादरम्यान घडली होती. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे मृत तरुणाबरोबरहच आरोपीदेखील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, संबंधित खूनाचे कारण आता समोर आले आहे.
मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद नंतर..
शनिवारी रात्री खराडी परिसरात मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद इतका वाढ गेला की, त्यांच्यात जोरदार भांडणं होऊ लागली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना शिवीगाळही केली होती. त्यानंतर तिन्ही आरोपींनी बादल शेख नावाच्या तरुणाच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल केले आणि नंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
हे ही वाचा : 6 ऑक्टोबरपासून विष योग निर्माण होणार, याचा काही राशीतील लोकांना धोका मिळणार, काय सांगतं राशीभविष्य?
या एकूण घटनेनंतर वाघोली परिसरात खळबळ उडाली. या एकूण घटनेची माहिती पोलिसांना कळताच तत्काळ घटनास्थळी दाखल होत तपास केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरु असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याचं म्हणाले होते. या घटनेनं पुण्यातील वाघोली परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
ADVERTISEMENT
