गजा मारणेला पोलिसांकडूनच VIP ट्रीटमेंट? पोलिसांच्या गाडीतच दिली बिर्याणी, व्हिडीओ समोर आल्यावर...

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. या फुटेजमध्ये दिसतोय गुंड गजा मारणे. मारणेला 3 मार्च रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृहातून सांगली जिल्हा कारागृहात नेत असताना पोलिसांनी त्याला बिर्याणीचं पॅकेट दिलं. यानंतर पोलीस आयुक्तांनी कारवाई केली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

14 May 2025 (अपडेटेड: 14 May 2025, 10:45 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुणे पोलिसांचा मोठा प्रताप, गुंडाला VIP ट्रीटमेंट

point

गुंड गजा मारणेला पोलीस वाहनातच दिली बिर्याणी पार्टी

point

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पोलिसांवर कारवाई

Pune Gaja Marne Video : पुण्यातला कुख्यात गुंड गजानन उर्फ ​​गजा मारणे याला पोलीस व्हॅनमध्ये मटण बिर्याणी दिल्याचा व्हिडिओ समोर आलाय. त्यानंतर आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी सहाय्यक निरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल अशा एकूण पाच जणांना निलंबित करण्याचे आदेश दिलेत. हा तोच गजा मारणे आहे जो पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. पोलिसांसमोर पुण्यातली गुन्हेगारी रोखण्याचं आवाहन असताना, अशी पोलिसांचीच या गुंडांवर मेहेरनजर असल्यानं नागरिकांसमोरच सध्या प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. 

हे वाचलं का?

गजा मारणेला पोलिसांकडूनच VIP ट्रीटमेंट 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. या फुटेजमध्ये दिसतोय गुंड गजा मारणे. मारणेला 3 मार्च रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृहातून सांगली जिल्हा कारागृहात नेत असताना पोलिसांनी त्याला बिर्याणीचं पॅकेट दिलं आणि गजाने त्यावर ताव मारला.

हे ही वाचा >>ज्या सोफिया कुरैशींचं देशभर कौतुक होतंय, त्यांना भाजप मंत्री म्हणाला 'ती त्यांचीच बहीण', प्रकरण काय?

गजा मारणे आणि टोळीवर मकोका

19 फेब्रुवारी रोजी कोथरूड शिवजयंती समारंभात सॉफ्टवेअर अभियंत्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली गजा मारणे तुरूंगात आहे. 24 फेब्रुवारी रोजी त्याच्या साथीदारांसह त्याला अटक करुन त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (MCOCA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं आहे.

खास ट्रीटमेंट मिळू नये म्हणून सांगणीला हलवलं, पण रस्त्यातच...

पोलीस आयुक्त कुमार यांच्या मते, गजाला तुरूंगात खास पाहुणचार मिळू नये, म्हणून त्याला सांगली कारागृहात पाठवण्यात आलं. येरवडा कारागृहात कोणत्याही चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी आणि शिस्त राखण्यासाठी त्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला असं अमितेश कुमार म्हणाले.

हे ही वाचा >>पाकिस्तानमध्ये भूकंप भारताच्या हल्लामुळे होतोय?, ही आहे किराणा हिल्सची सगळी Inside स्टोरी!

गजासाठी पोलिसांच्या गाडीमागे एक लक्झरी कार? 

मात्र, सांगलीकडे जाताना तेच घडलं. पोलीसांचं पथक साताऱ्याजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ढाब्यावर थांबलं अशी माहिती आहे. "अधिकाऱ्यांनी मटण बिर्याणी खरेदी केली आणि ती थेट पोलीस वाहनातच मारणेला दिली. तसंच या पोलीस व्हॅनच्या मागेच एक लक्झरी कारही चालत होती अशी माहिती आहे.

दरम्यान, या प्रकरणी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस पथकाविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या व्हिडिओमुळे संताप व्यक्त होत असून, कस्टडी प्रोटोकॉलवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

 

    follow whatsapp