पुण्याची गोष्ट : पुणे रेल्वे स्थानकातील दररोज होणारा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने एक नवीन उपायोजना आखली. पुणे स्थानकातून सुटणाऱ्या दोन रेल्वे गाड्या दुसऱ्याच स्थानकातून सुटणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन रेल्वे गाड्यांचे टर्मिनल बदलल्याची अपडेट समोर आली आहे. यामुळे आता पुणे रेल्वे स्थानाकातील ताण कमी होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
पुण्याऐवजी हडपसर येथून धावणार रेल्वे
पुणे-नांदेड-पुणे एक्स्प्रेस आणि पुणे-हरंगुळ-पुणे एक्सप्रेस या दोन रेल्वे आता पुण्याऐवजी हडपसर येथून धावणार आहेत. तसेच या मार्गाद्वारे होणारा परतीचा प्रवास वाचण्याची शक्यता आहे. तसेच या दोन्ही रेल्वे आता 26 जानेवारीपासून नववर्षाच्या सुरुवातीलाच हडपसर स्थानकातून सुटणार असल्याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
दरम्यान, पुणे रेल्वे स्थानकाला एक पर्यायी रेल्वे स्थानक म्हणून हडपसर नवीन टर्मिनल बांधण्यात आले आहे. अशातच हिरंगुळ एक्सप्रेससह आठ रेल्वे गाड्या टर्मिलन सुटण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. अशातच या टर्मिनलमुळे पुण्यातील काही पूर्वेकडील भागांतील पुणेकरांना याचा चांगला फायदा होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत टर्मिनल करण्यात येत आहे. अशातच आता याचे वेळापत्रकही समोर आलेलं आहे.
वेळापत्रकही आलं समोर
हडपसर-हजूर साहीब नांदेड-हडपसर एक्स्प्रेसने नागरिकांना रोजचं प्रवास करता येणार आहे.
हजूर साहीब नांदेड एक्सप्रेस गाडी क्रमांक 17630 ही 26 जानेवारीपासून दररोज रात्री 9:50 वाजता हडपसर स्थानकावर पोहोचेल.
तसेच गाडी क्रमांक 17630 हजुर हजूर साहीब नांदेड एक्स्प्रेस 26 जानेवारीपासून दररोज पहाटे 4:35 मिनिटांनी हडपसर स्थानकातून सुटेल.
हडपसर-हरंगुळ-हडपसर एक्सप्रेस गाडी क्रमांक 01487 हडपसर- हरंगुळ एक्सप्रेस 26 जानेवारीपासून दररोज सकाळी 6:20 वाजता हडपसर येथून सुटेल.
गाडी क्रमांक 01488 हरंगुळ-हडपसर एक्स्प्रेस दररोजच 26 जानेवारीपासून रात्री 8:45 वाजता हडपसर येथे पोहोचेल.
ADVERTISEMENT











