पुण्यात अवकाळी पावसाचा हाहाकार, गारांमुळे 'या' भागाला शिमल्याचं स्वरुप, Video व्हायरल

मुंबई तक

• 08:54 PM • 30 Mar 2026

pune news : सध्या उन्हाळा ऋतु सुरु असून पुण्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. अवकाळीमुळे पुणेकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडालेली दिसत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती.

pune news

pune news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुणे शहरात अवकाळी पावसाचे थैमान

point

 पुण्यात कुठे कुठे अवकाळी पाऊस? 

पुण्याची गोष्ट : सध्या उन्हाळा ऋतु सुरु असून पुण्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. अवकाळीमुळे पुणेकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडालेली दिसत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. पुणे जिल्ह्यासह इतर भागांत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याचं चित्र आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नालासोपाऱ्यात डोकं नसलेला मृतदेह पोत्यात आढळला, टॅटूमुळे मृतदेहाची ओळख पटली, घटनेनं परिसर हादरला

पुणे शहरात अवकाळी पावसाचे थैमान

पुणे शहरात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे पुण्याच्या रस्त्याला नाल्याचे स्वरुप आले आहे. याच अवकाळीमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आयटी हब अशी ओळख असलेल्या पुण्यातील हिंजवडी ओळखल्या जाणाऱ्या परिसरात गारपीट झाली. या गारपीटीमुळे मैदानात गारा पडल्याचं दिसून येत आहे.

 पुण्यात कुठे कुठे अवकाळी पाऊस? 

संबंधित पावसाचे तसेच गारांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. औंध, बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे आणि पाषाण परिसरातही पावसाचा तुफान फटका बसल्याचं चित्र आहे. या अवकाळी पावसाने लोकांची चांगलीत तारांबळ उडाली आहे. 

हे ही वाचा : 40 वर्षीय महिलेची 28 वर्षीय तरुणाशी इंस्टाग्रामवर ओळख, चार मुलं सोडून पत्नी बॉयफ्रेंडसोबत गेली पळून

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दुपारनंतर अचानकपणे वातावरणात बदल निर्माण झाला आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरु झाला. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला खरं, पण उन्हाळा ऋतु सुरु असून अवकाळी पावसाने हजेरी लावणं ही धोक्याची घंटा आहे.