पुणे : पानशेतमध्ये रविवारी रात्री 24 वर्षीय रोहिदास काटकर या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी नऱ्हे येथून पाच मजुरांना अटक केली आहे. काटकर यांचा खून वादविवादातून झाल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगल यांनी दिली.
ADVERTISEMENT
फिरायला आलेल्या तरूणांनी डोक्यात दगड घातला
वेल्हा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगल यांनी सांगितलं की, काटकर आणि त्यांचा मित्र विजय जाधव हे पानशेत येथील एका खाद्यपदार्थांच्या दुकानासमोर उभे होते. त्याचवेळी हा प्रकार घडला. "पाच जण मोटरसायकलवरून तिथे आले आणि त्यांनी कटकर आणि जाधव यांना हातापायांनी मारहाण केली. यापैकी एकाने मोठा दगड उचलून कटकर यांच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात काटकर बेशुद्ध पडल्यानंतर आरोपींनी पळ काढला.
हे ही वाचा >>जावई सासूसोबत नाही तर तिच्या 'सुनेसोबत' गेला पळून, बायकोला म्हणाला, तुझी वहिनी जरा जास्तच...
सीसीटीव्ही तपासले, 5 आरोपी सापडले
रोहिदास काटकर याला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं," असे खामगल म्हणाले. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये नोंदवलेल्या वाहनांच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे संशयितांना शोधून काढलं.
"आम्ही नऱ्हे येथून पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. सर्व आरोपी हे रोजंदारीवर काम करणारे मजूर असून, रविवारी पानशेतमध्ये फिरण्यासाठी ते गेले होते. काटकर यांच्याशी त्यांचा वाद झाला, त्यामुळे त्यांनी हा हल्ला केला," असं खामगल यांनी स्पष्ट केलं.
हे ही वाचा >>पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या व्यवसायाच्या नावाखाली सुरू होतं भलतंच...
दरम्यान, या प्रकरणी संशयितांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (खून) आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
