Ratnagiri News: रत्नागिरीमधील पाचल मध्ये राहणाऱ्या जोडप्याच्या नवजात बालकाचा चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यावेळी डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात नेतो असं सांगून खाजगी हॉस्पिटलमध्ये नेलं. निष्काळजीपणामुळे हा धक्कादायक प्रकार घडला. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
रत्नागिरीमधील पाचल शहरात राहणारे फिर्यादी हे एस.टी. महामंडळ राजापुर आगार येथे नोकरी करतात. दिनांक 30/30/2024 रोजी फिर्यादी यांची पत्नी प्रसुती करीता ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे पहाटे 3:30 वाजता दाखल झाली. त्यावेळी फिर्यादी यांच्या पत्नीची परिस्थिती गंभीर होती. त्या अवस्थेत तिला दुसऱ्या रुग्णालयात रेफर करणं आवश्यक होतं. मात्र, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात रेफर केलं नाही. अशा गंभीर अवस्थेत तिला संध्याकाळ पर्यंत रायपाटण ग्रामीण रुग्णालयात उशिरापर्यंत थांबवून ठेवले.
शासकीय रुग्णालय सांगून खाजगी रुग्णालयात दाखल
त्यावेळी डॉक्टर रायपाटण ग्रामीण रुग्णालयात प्रमुख स्त्री रोग तज्ञ असतांना तेथे 24 तास हजर न राहता त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीची दिशाभूल केली. त्यांच्या पत्नीला त्यावेळी आवश्यक उपचारांची गरज होती. मात्र, डॉक्टरांनी रत्नागिरीतील शासकिय रुग्णालयात रेफर करतो, असं सांगून स्वतःच्या खाजगी रुग्णालयात महिलेला दाखल केलं. इतकेच नव्हे, तर या सगळ्यात शासकिय रुग्णवाहीकेचा गैरवापर करण्यात आला.
हे ही वाचा: Pune : महिला रिलस्टारने आधी प्रियकराचे हात-पाय बांधले, नंतर केलं विचित्र कृत्य...
कोल्हापुरच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला
याव्यतिरिक्त, फिर्यादी यांच्या नवजात बालकास रत्नागिरी येथे नेताना ऑक्सिजन न लावता तसंच नेण्यात आलं. त्यावेळी त्या बाळाच्या उपचारासाठी डॉ. सांघवीकर यांनी कोल्हापूरला नेण्यास सांगितलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बाळाला आधी साईस्पर्श हॉस्पिटल आणि नंतर सी.पी.आर या कोल्हापुरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं.
हे ही वाचा: महिला हॉटेलमध्ये प्रियकरासोबत आलेली रंगात, पतीची अचानक एंट्री.. थेट छातावरून मारली उडी
गुन्हा दाखल
सी.पी.आर. हॉस्पिटलमध्ये त्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचं फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला सांगण्यात आलं. रत्नागिरीमध्ये रायपाटण रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे फिर्यादी यांच्या पत्नीचे गर्भाशय काढून टाकावे लागले. नवजात बालकाच्या मृत्युसाठी आणि फिर्यादी यांच्या पत्नीच्या गंभीर प्रकृतीसाठी रायपाटण रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेसंबंधी गुन्हा राजापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
