पुरोगामी महाराष्ट्र हादरला; धार्मिक संस्थेत विद्यार्थ्याला शॉक देऊन जीवं मारलं, कारण ऐकून अंगावर येईल काटा

Kolhapur Crime News : पुरोगामी महाराष्ट्रात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील आळते येथे एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या केली. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

kolhpaur crime news

kolhpaur crime news

मुंबई तक

18 Jun 2025 (अपडेटेड: 18 Jun 2025, 01:21 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुरोगामी महाराष्ट्रात मन हेलावून टाकणारी घटना घडली

point

कोल्हापूरमध्ये एकच खळबळ

Kolhapur Crime News : पुरोगामी महाराष्ट्रात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील आळते येथे एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या केली. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. फैजान नाजिमा असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या मुलाचे वय वर्षे 11 असल्याची माहिती समोर आली आहे. या संस्था बंद पडून आपल्याला घरी जायला मिळवं, यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्याने फैजानची हत्या केली. 

हे वाचलं का?

हेही वाचा : आईचं होतं एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर, बाप लेकानं रचला कट अन्...नेमकं 'त्या' रात्री काय घडलं?

आळते येथील धार्मिक शिक्षण संस्थेमध्ये तब्बल एकूण 80 विद्यार्थी आहेत. यापैकी, काही विद्यार्थी हे बिहारमधील आहेत. हत्या करण्यात आलेल्या फैजान नजीमा आणि हत्या करणारे हे बिहारचे असल्याची माहिती समोर आली आहे. हत्या करणारे विद्यार्थी बिहारमधील आपल्या गावी जात होते. त्यासाठी ही संस्था बंद पाडण्याचा त्यांचा मुख्य उद्देश होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याच प्रकरणात पोलिसांनी संस्थेतील विद्यार्थ्यांची चौकशी केली आहे. 

कोल्हापूर हादरलं

एका अल्पवयीन विद्यार्थ्याने फैजानला इलेक्ट्रीक वायरचा शॉक देऊन हत्या केली आहे. यानंतर फैजानचा मृतदेह सापडला असून झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सुरुवातीला दिली जात होती. या प्रकरणाचा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी संस्थेतील विद्यार्थ्यांची चौकशी केली. अशावेळी आपण फैजानला शॉक देऊन हत्येची कबुली दिली आहे. या घटनेनं कोल्हापूर पुरतं हादरून गेलं आहे. 

या प्रकरणात पोलिसांनी चौकशी करत माहिती दिली की, अल्पवयीन विद्यार्थ्याने इलेक्ट्रिक वायरचा शॉक दिला असल्याचे पोलिसांनी सांगितलं. एखादी शिक्षण संस्था बंद पाडण्याचा विचार या मुलांच्या मनात कसा येतो? असा सवाल आता पोलिसांसमोर आहे. यापूर्वी या पुरोगामी महाराष्ट्रात अशी घटना घडली नव्हती. 

हेही वाचा : पत्नीला कोयत्यानं मारून संपवलं, मध्ये येणाऱ्या चिमुकल्यांवरही वार... पंढरपुरात पती का झाला राक्षस?

यावेळी पोलिसांच्या चौकशीत संस्थेतीलच एका अल्पवयीन विद्यार्थ्याने इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन हत्या केल्याचे कबूल केले. इतकी थरारक, धक्कादायक आणि तितकीच हादरवणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली. 
 

    follow whatsapp