Pune: कला केंद्रात गोळीबार, NCP च्या आमदाराच्या भावाचा समावेश असल्याची जोरदार चर्चा?

Pune Shocking Viral News :  पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील चौफुला येथील अंबिका कला केंद्रावर सोमवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली.

Pune Shocking News Viral

Pune Shocking News Viral

मुंबई तक

23 Jul 2025 (अपडेटेड: 24 Jul 2025, 09:04 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील अंबिका कला केंद्रावर गोळीबार

point

पोलिसांनी चार जणांविरोधात केला गुन्हा दाखल

point

आमदार रोहित पवार काय म्हणाले?

Pune Shocking Viral News :  पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील चौफुला येथील अंबिका कला केंद्रावर सोमवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका विद्यमान आमदाराच्या भावाचाही समावेश असल्याची चर्चा सुरु आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. पण पोलिसांकडून या घटनेबाबत कोणतीही माहिती उघड करण्यात आली नव्हती. अखेर आज बारामती उपविभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याचं माध्यमांशी बोलताना म्हटलं. दरम्यान, याप्रकरणी बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे यांच्यासह एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कला केंद्रावर झालेला हा गोळीबार हवेत करण्यात आला असला, तरी नेमका कोणत्या कारणावरून करण्यात आला? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

हे ही वाचा >> कल्याण: 'आधी तिने माझ्या सुनेच्या कानाखाली मारली, नंतर..', मराठी तरूणीच्या मारहाणीचा नवा VIDEO आला समोर!

आमदार रोहित पवार काय म्हणाले?

पोलिसांनी या परिसरातील तिन्ही कला केंद्राच्या संचालकांकडे विचारपूस केली. परंतु, आपल्याकडे असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं संचालकांचं म्हणणं आहे. कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी याप्रकरणावरून सरकारला घेरलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली अन् चौकशी सुरु केली.

याप्रकरणी अंबिका कला केंद्राच्या मॅनेजरने तक्रार दिली असून पोलिसांनी चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आरोपी अटक नसले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराच्या भावाचा आरोपींमध्ये समावेश असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. पोलीस याबाबत नेमका काय तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

हे ही वाचा >> प्रेयसीसोबत सतत शारीरिक संबंध, गरोदर राहिली पण... पुण्यातील महिलेवर लैंगिक अत्याचार

    follow whatsapp