विकृतीचं टोक! पुण्यात तरुणाने श्वानावर केले लैंगिक अत्याचार, धक्कादायक प्रकरण कॅमेऱ्यात कैद, प्राणी मित्रांचा संताप

Pune Crime : पुणे शहरातील मॉडेल कॉलनीत भुतदयेला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने श्वानावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना एका कॅमेऱ्याद कैद झाल्याची माहिती काही प्रसारमाध्यमाने दिली.

pune crime a young man sexually abused a dog at model colony

pune crime a young man sexually abused a dog at model colony

मुंबई तक

18 Oct 2025 (अपडेटेड: 18 Oct 2025, 03:03 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुणे शहरातील मॉडेल कॉलनीत काळीमा

point

तरुणाने केले श्वानाचे लैंगिक शोषण

Pune Crime : पुणे शहरातील मॉडेल कॉलनीत भुतदयेला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने श्वानावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना एका कॅमेऱ्याद कैद झाल्याची माहिती काही प्रसारमाध्यमाने दिली. स्थानिक प्राणीप्रेमींनी त्या तरुणाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या घटनेनं पुण्यातील मॉडेल कॉलनीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या या हैवानी कृत्याचा व्हिडिओ हा चतुश्रृंगी पोलिसांना देण्यात आला आहे. संबंधित व्हिडिओमुळे हे प्रकरण 22 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर रोजी घडल्याचे उघड झालं आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा :  नंदुरबार जिल्ह्यात भीषण अपघात, देवीच्या यात्रेवरून येणारी पिकअप उलटली, 6 जणांचा मृत्यू तर...

आरोपीच्या मुसक्या आवळल्या 

या प्रकरणात आरोपीचं नाव श्यामराव धोत्रे (वय 59) असे आहे. पोलिसांनी या नराधमाच्या मुसक्या आवळण्याचे काम केले आहे. संजय शिंदे, साहिल कारंडे, रॉजर जोसेफ, भाग्येंद्र चुडासामा हे गेल्या अनेक वर्षांपासून श्वानांना खायला घालतात. या प्रकरणात संजय शिंदे यांना महादेव मंदिर परिसरात श्वान अचानकपणे गायब झाल्याचं समजलं, हे ऐकूण त्यांना धक्का बसला. 

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वानावर एका नराधमाने अत्याचार केले होते. या प्रकरणी आता आरोपी तरुणाचे श्याम धोत्रे असे नाव समोर आले. अशातच आता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी हा वडारवाडीतील रहिवासी असल्याचे सांगत आहे. नागरिकांनी दिलेला संबंधित व्हिडिओ खरा असल्याचं समजताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

हे ही वाचा :  Dhantrayodashi 2025: धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करावी? 'या' मुहूर्तावर करा खरेदी...

प्राणी मित्रांमध्ये संतापाची लाट

प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या या तक्रारीनंतर पोलीस उपनिरीक्षक स्नेहल पाटील यांनी एकूणच तक्रार नोंदवून घेतली. याचपार्श्वभूमीवर बीएनएस आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधित कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण समोर आल्यानंतर प्राणी मित्रांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी सर्वत्र मागणी होताना दिसते. 

    follow whatsapp