पुण्यातील सॉफ्टवेअर इंजीनिअरला जुगाराचा नाद... आर्थिक नुकसान अन् चार्जिंग केबलने फाशी घेत टोकाचं पाऊल!

पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीच्या परिसरात 24 वर्षीय सॉफ्टवेअर इंजीनिअरचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित इंजीनिअरने मोबाईल चार्जिंग केबलने फाशी घेऊन आत्महत्या केली.

चार्जिंग केबलने फाशी घेत इंजीनिअरचं टोकाचं पाऊल!

चार्जिंग केबलने फाशी घेत इंजीनिअरचं टोकाचं पाऊल!

ओमकार वाबळे

• 04:54 PM • 07 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील सॉफ्टवेअर इंजीनिअरला जुगाराचा नाद...

point

आर्थिक नुकसानामुळे चार्जिंग केबलने फाशी घेत उचललं टोकाचं पाऊल!

Pune Crime: पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क येथून खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे एका नामांकित आयटी कंपनीच्या परिसरात 24 वर्षीय सॉफ्टवेअर इंजीनिअरचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित इंजीनिअरने मोबाईल चार्जिंग केबलने फाशी घेऊन आत्महत्या केली. संबंधित घटना ही हिंजवडी आयटी पार्कच्या फेज-3 येथील कॅम्पसमध्ये घडली. 

हे वाचलं का?

आयटी इंजीनिअर म्हणून कार्यरत होता... 

पोलिसांच्या माहितीनुसार, सुजल विनोद ओसवाल अशी मृताची ओळख समोर आली असून तो पुण्यातील वानवडी परिसरातील रहिवासी होता. तसेच, तो आयटी इंजीनिअर पदावर कार्यरत होता. रात्री 12:30 च्या सुमारास, परिसरात गस्त घालत असताना सिक्योरिटी गार्ड्सना वॉशरूममध्ये सुजलचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्यानंतर, तातडीने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाबाबत कळवलं आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. 

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा तपास सुरू करण्यात आला. प्राथमिक तपासानुसार, तरुणाने वॉशरूमच्या आत मोबाईल चार्जिंग वायरचा वापर करून फाशी घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी पाठवला. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकावर मोठं अपग्रेड! तीन नव्या मार्गिकांमुळे ट्रेनच्या फेऱ्या वाढणार...

जुगारात हारल्याने पैशांचं मोठं नुकसान 

पिंपरी-चिंचवडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरूवातीला हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं उघडकीस आलं. तसेच पीडित सुजल ओसवाल मागील काही काळापासून आर्थिक तणावात होता, असं पोलिसांनी सांगितलं. प्राथमिक तपासात समोर आलं की, सुजल जुगारात हारल्यामुळे त्याला पैशांचं मोठं नुकसान झालं होतं. याच कारणामुळे तो मानसिक तणावात होता. पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, तरुणाने आत्महत्या होण्यापूर्वी त्याच्या कुटुंबियांना एक मॅसेज पाठवला होता. त्यामध्ये, त्याने त्याच्यावर ओढवलेल्या संकटाबद्दल सांगितलं होतं. 

हे ही वाचा: वर्दी घालून आला अन् रात्री घराबाहेर पडलेल्या तरुणीला उचललं... बळजबरीने स्कोर्पिओत बसवून सामूहिक बलात्कार!

सध्या, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे. पोलीस आता मृताचे कुटुंबीय, सहकारी आणि कंपनीतील अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवत आहेत. सध्या, या प्रकरणासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास केला जात आहे. 

    follow whatsapp