Medha Kulkarni : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात ऐन दिवाळी सणातच शनिवार वाड्यात नमाज पाठणावरून वादंग निर्माण झाला. पेशव्यांच्या शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिला नमाज पठण करताना दिसत असल्याचा त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर आता भाजप राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्हि़डिओ सोशल मीडियावर शेअर करत हा ऐतिहासिक वारशाचा अवमान असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी हे सर्व मतांचं ध्रुवीकरण करण्याचं काम सुरु असल्याचं म्हणत मेधा कुलकर्णींवर टीका केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुणे तिथे काय उणे! पोलिसांनी ट्रक थांबवला, अचानक ड्रायव्हरचा पाराच चढला, भररस्त्यातच पोलिसाला जबर मारहाण
एकूण प्रकरण काय?
19 ऑक्टोबर रविवारी रोजी मेधा कुलकर्णी यांनी सकल हिंदू समाज आणि पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शनिवार वाडा संकुलात जोरदार निदर्शने केली आणि प्रार्थनास्थळ शुद्ध करण्यासाठी त्यावर गोमूत्र आणि शेण शिंपडण्यात आले. पोलीस आणि निदर्शकांमध्ये झालेल्या या संघर्षामुळे परिस्थिती आणखीच बिकट झाल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि पोलिसांनी नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम केले.
खरंतर, शनिवारी पुण्यातील शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिला या नमाज अदा करताना दिसत होत्या. व्हिडिओ पाहिल्यानंतर कळते की, पाच ते सहा मुस्लिम महिला नमाज अदा करत होते. त्याच ठिकाणी काही पर्यटक फिरताना दिसत होते. संबंधित सोशल मीडियावर जशा व्हायरल झाला, त्यानंतर पुन्हा सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले. याच प्रकरणी आता मेधा कुलकर्णी यांनीही 'x' वर पोस्ट शेअर केली.
त्या पोस्टमध्ये मेधा कुलकर्णी यांनी लिहिले की,' शनिवार वाड्यात नमाज पठण करून दिले जाणार नाही. हिंदू समाज आता जागा झालेला आहे. चला शनिवार वाड्यात जाऊ!', त्यांनी रविवारी दुपारी 4 कसबा पोलीस ठाण्यासमोर निषेधाची घोषणा केली असकता, मेधा कुलकर्णींच्या निषेधामुळे शनिवार वाडा बंद करण्यात आला होता. तसेच काही कार्यकर्त्यांनी शनिवार वाड्याबाहेर असलेल्या हजरत दर्ग्याजवळ निदर्शने केली. तेव्हा पोलिसांनी ही निदर्शने रोखण्याचे काम केले. त्यानंतर हाणामारीत काहीजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहेत आणि परिसरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
"शनिवार वाडा हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक स्थळ आहे . येथे कोणत्याही धर्माचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. नमाजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी पुरातत्व विभागाशी संपर्क साधला, त्यांनी ही कारवाई तात्काळपणे थांबवण्यास सांगितले, पुन्हा अशा घटना कधीही घडू नये यासाठी हा आवाज उठवल्याचे त्या म्हणाल्या.
शनिवार वाड्याबाहेर असलेल्या बेकायदेशीर धार्मिक स्थळाचा उल्लेख करत म्हटले की, जर नमाज पठण करण्याची परवानगी असेल तर हिंदूंना मशिदींमध्ये किंवा ताजमहालमध्ये आरती करण्याचा अधिकार दिला पाहिजे, असं त्या म्हणाल्या होत्या.
हे ही वाचा : पलंगावर झोपलेल्या पतीला गोळ्या घालून संपवलं, शेजारी झोपलेल्या पत्नीला अंदाजही आला नाही, टॉर्च लावून पाहाताच....
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे काय म्हणाल्या?
दरम्यान, या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात एफआरआय दाखल करण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे म्हणाल्या, कुलकर्णी हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण आहेत. शनिवार वाड्यातील असलेली कबर ही अनेक दशकांपासून आहे; नमाज पठण करणे हा गुन्हा नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतांचे ध्रुवीकरण करण्याचे षड्यंत्र आहे, अशा त्या म्हणाल्या.
ADVERTISEMENT
