Maharashtra News : यमाची पडली वक्रदृष्टी; महाराष्ट्रात 20 जणांचा बुडून मृत्यू!

रोहिणी ठोंबरे

23 May 2024 (अपडेटेड: 23 May 2024, 01:48 PM)

Maharashtra : गेल्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या 4 दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये जवळपास 20 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे चारही घटनांमध्ये सर्वांचा मृत्यू हा बुडून झाला आहे. 

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्र : 20 People Drowned in Maharashtra : गेल्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राला (Maharashtra) हादरवून सोडणाऱ्या 4 दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये जवळपास 20 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे चारही घटनांमध्ये सर्वांचा मृत्यू हा बुडून झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक, अहमदनगर, इंदापूर, रत्नागिकी आणि इगतपुरी याठिकाणी या घटना घडल्या आहेत. नेमकं काय घडलं? याबाबत आपण 'मुंबई तक'च्या या बातमीतून सविस्तर जाणून घेऊयात. (20 people drowned in that 4 incidents of maharashtra everyone is shocked after this)

हे वाचलं का?

पोहायला गेले अन्... मामासह 4 भाच्यांचा बुडून मृत्यू

नाशिकमधल्या गोसावीवाडीत राहणाऱ्या हनिफ शेखकडे (24 वय) त्याच्या भाच्यांनी पोहायला जाऊया असा हट्ट धरला. कडाक्याचं ऊन असल्याने थंडाव्यासाठी हनिफनेही इगतपुरीच्या बाहुली धरणावर जाण्याचा प्लॅन केला. पोहायला मिळणार म्हणून भाचे मंडळीही खुश झाली. एकाच रिक्षाने लहान मुलांसह नऊ जण धरणाकडे गेले. त्यावेळी दोघेजण खोल पाण्यात गेले यामध्ये एकाचा पाय खाली अडकला. त्याला वाचवण्यासाठी मामासह दोन छोट्या मुलींनी पाण्यात उडी मारली. यासर्वात हनिफ शेख (वय 24), अनस खान (वय 15), नासिया खान ( वय 15 ), मिजबाह खान (वय 16) आणि ईकरा खान (वय 14) अशा 5 जणांचा बुडून मृत्यू झाला. नंतर, स्थानिक आदिवासी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले.

हेही वाचा : बुडालेल्यांचा शोध घेताना SDRF ची बोट उलटली, तीन जवानांचा मृत्यू

उजनी धरणाच्या भीमा नदी पात्रात 6 जण बुडाले

माढा तालुक्यातील उजनी धरणातही एक धक्कादायक घटना घडली आहे. वादळी वारे सुटले असल्याने बोट उलटली आणि 6 जणांचा बुडून मृत्यू झाला. यातील चौघे एकाच कुटुंबातील होते. गोकूळ जाधव, कोमल गोकूळ जाधव (वय 25), शुभम गोकूळ जाधव (दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय 3 वर्षे) अशी मृतांची नावं आहेत. आणखी दोन तरूणांचाही मृतांमध्ये समावेश आहे. तर, यातील एकाने पोहत आपला जीव वाचवला.

बुडालेल्या तरूणाचा शोध घेण्यासाठी आलेल्या SDRF ची बोट उलटली; 3 जवानांचा मृत्यू

अहमदनगरमधील प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटून बचावकार्यात आलेल्या 3 जवानांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणीच आदल्या दिवशी पोहण्यासाठी उतरलेले दोन तरूण बुडाले होते. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला होता मात्र दुसर्‍या तरूणाच्या शोधासाठी आलेले SDRF जवान देखील मृत्यूमुखी पडले आहेत. त्यांची बोट बुडाल्याने मृत्यू झाला.  

हेही वाचा : PN Patil : निष्ठावंत हरपला! काँग्रेसचे आमदार पाटील यांचे उपचारादरम्यान निधन

    
चिमुकलीला वाचवण्यासाठी आईनेही मारली उडी, मायलेकींचा बुडून मृत्यू

इगतपुरीमधील मुंढेगावात हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. विहिरीत पाय घसरून पडलेल्या आपल्या 3 वर्षांच्या मुलीला वाचवण्यासाठी आईने उडी मारली. यामध्ये दोघींचा बुडून मृत्यू झाला.  मायलेकी शेनवड खुर्द या गावात राहात होत्या. महिला विहिरीत पडल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शेतातील या विहिरीकडे धाव घेतली आणि मृतदेह बाहेर काढले. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. 

हेही वाचा : भाजपला 272 जागा मिळाल्या नाही तर.. पवारांचं मोठं विधान

पाण्याने केला दोन तरूणांचा घात, तुंबाडच्या नदीत बुडून मृत्यू

दुपारच्या सुमारास मित्रांसोबत रत्नागिरीतील तुंबाड नदीपात्रात पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. सौरभ हरिश्चंद्र नाचरे (19) आणि अंकेश संतोष भागणे (20) अशी मृत मुलांची नावं आहेत. इतर मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. पोलिसही घटनास्थळी तत्काळ पोहोचले.

    follow whatsapp