Ahmednagar Boat Accident : बुडालेल्यांचा शोध घेताना SDRF ची बोट उलटली, तीन जवानांचा मृत्यू
SDRF boat capsized in pravara river : पोहण्यासाठी आलेले दोन मुले प्रवरा नदीत बुडाली होती. त्यांचा शोध घेत असलेल्या एसडीआरएफच्या बोटीला अपघात झाला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अहमदनगरमध्ये मोठी दुर्घटना
एसडीआरएफच्या तीन जवानांचा मृत्यू
बुडालेल्या तरुणांचा शोध घेताना दुर्घटना
Ahmednagar Boat Accident Latest update : पाण्यात बुडून मृत्यू होण्याची मालिकाच राज्यात घडताना दिसत आहे. उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये प्रवासी बोट बुडून पाच जणांचा मृत्यू झाला. असतानाच अहमदनगरमधील प्रवरा नदीत काही जण बुडाले. त्यांचा शोध घेण्यासाठी नदीत उतरलेली एसडीआरएफची बोटही उलटल्याचे घटना समोर आली आहे. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. (Three SDRF Jawan drowned in pravara river)
ADVERTISEMENT
उजनी धरणात पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेची चर्चा सुरू असतानाच अहमदनगरमधील प्रवरा नदीत मोठी दुर्घटना घडली. प्रवरा नदीत दोन जण बुडाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफच्या तुकडीला पाचारण करण्यात आले होते.
हेही वाचा >> 'संधी असेल तर पुरेपूर फायदा घ्यायचा...', पवारांचा सत्ता मिळविण्याचा मास्टर प्लॅन!
पोहोण्यासाठी दोन मुले आली होती. एकाचा मृतदेह सापडला, तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. त्यासाठी सकाळी एसडीआरएफच्या पथकाला बोलवण्यात आले. बचाव कार्य करताना त्यांची बोट उलटली. पाच जण पाण्यात बुडाले. चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
हे वाचलं का?
बोटीत असलेल्या दोघांसह काल बुडालेल्या मुलाचा शोध आता हाती घेण्यात आला आहे. एसडीआरएफच्या जवानांकडून आता बुडालेल्यांचा शोध सुरू असून, या घटनेमुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
उजनी धरणात बुडालेल्या पाच जणांचा मृत्यू
२१ मे रोजी उजनी धरणाच्या जलाशयात बोट उलटली होती. बोटीतील सहा जण धरणात बुडाले होते. त्यांचा शोध सुरू होता. अखेर तिसऱ्या दिवशी पाच जणांचे मृतदेह आढळून आले, असून अजून एकाचा शोध सुरू आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> भाजपचा होणार मोठा विजय! अमेरिकेतील विश्लेषकाने सांगितला आकडा
ज्या ठिकाणी बोट बुडाली होती, त्याच परिसरात गुरूवारी (२३ मे) सकाळी पाच जणांचे मृतदेह आढळून आले. एसडीआरएफचे वीस जवान बोटीतून त्यांचा शोध घेत होते.
ADVERTISEMENT
उजनी धरणात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे
गोकुळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकुळ जाधव (वय २५), माही गोकुळ जाधव (वय ३), शुभम गोकुळ जाधव (वय १८ महिने, सर्व रा. झरे ता.करमाळा) अनुराग ज्ञानदेव अवघडे (वय २६) यांचे मृतदेह सापडले. तर गौरव धनंजय डोंगरे (वय २४, रा. कुगाव ता.करमाळा) यांचा शोध सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT