1206 लकी नंबर ठरला अनलकी, 12-06 ही तारीख माजी मुख्यमंत्र्यांचा ठरला अखेरचा दिवस

Ahmedabad Plan Crash : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या भीषण अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा 1206 हा लकी नंबर आहे. 12-06 या लकी नंबरच्या तारखेदिवशी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे.

ahmedabad Plan Crash accident Vijay rupani death on 12-06 date

ahmedabad Plan Crash accident Vijay rupani death on 12-06 date

मुंबई तक

• 02:16 PM • 13 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या भीषण अपघाताने संपूर्ण देश हादरला

point

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू

Ahmedabad Plan Crash : गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या भीषण अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या अपघातात प्रवाशांच्या मृत्यूचा आकडा 265 वर गेला आहे. गुरुवारी 12 जून रोजी अहमदाबादहून लंडनकडे जाणारं विमान कोसळल्याने विमानाचा मोठा अपघात झाला. या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : Ahmedabad Air India crash: अहमदाबाद विमान अपघातात हादरवून टाकणारा मृतांचा नेमका आकडा आला समोर

माजी मुख्यमंत्र्यांचं विमान अपघातात निधन 

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा 1206 हा लकी नंबर होता. त्यांच्याकडे असणाऱ्या वाहनांवर हाच नंबर लावण्यात आला होता. परंतु गुरूवारी हाच लकी नंबर अनलकी ठरला. योगायोगाने12-06 हा गाडीचा लकी नंबर असल्याने माजी मुख्यमंत्र्यांनी 12 जून दिवशीच फ्लाइट बुक केली होती. मात्र, त्याच दिवशी विजय रुपानी यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. 

विमान अपघाताची माहिती मिळताच विजय रुपानी यांच्या निवासस्थानी आणि परिसरात शांतता पसरली आहे. विजय रुपानी यांच्या जाण्यानंतर रुपानी कुटुंबाकडून कोणतंही निवेदन देण्यात आलेलं नाही. तसेच त्यांच्या घरात कोणीही उपस्थित नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाने उड्डाण केल्यानंतर, काही मिनिटांतच लँड झालं. त्याचक्षणी ते विमान बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका खानावळीच्या इमारतीला धडकले. त्यानंतर, अतुल्यम वसतिगृहालाही विमान धडकले. अतुल्यम वसतिगृहाच्या बाजूलाच डॉक्टरांचे निवासस्थान होते. 

हेही वाचा : Plane Crash: संपूर्ण विमान जळून राख झालं तरी तो कसा वाचला? बचावलेल्या रमेशचा प्रत्येक शब्द तुमच्या अंगावर आणेल काटा!

दरम्यान, या धडकेत दोन्ही इमारतींना आग लागली आणि या अपघातात अनेक लोक जखमी आहेत. सध्या स्थानिक प्रशासन  आणि वैद्यकीय पथके दिवसरात्र मदत कार्यात आहेत.  अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 8 ते 9 वाजताच्या दरम्यान घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. 

    follow whatsapp