कर्जत तहसीलमधील कर्मचाऱ्याचा अनैतिक संबंधातून खून, मृतदेह पाटबंधारे विभागाच्या खोलीत फेकला

Ahilyanagar Crime : कर्जत तहसीलमधील कर्मचाऱ्याचा अनैतिक संबंधातून खून, मृतदेह पाटबंधारे विभागाच्या खोलीत फेकला

Ahilyanagar Crime

Ahilyanagar Crime

मुंबई तक

15 Nov 2025 (अपडेटेड: 15 Nov 2025, 06:29 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कर्जत तहसीलमधील कर्मचाऱ्याचा अनैतिक संबंधातून खून

point

मृतदेह पाटबंधारे विभागाच्या खोलीत फेकला

Ahilyanagar Crime, अहिल्यानगर : मिरजगाव परिसरात शुक्रवार, 14 नोव्हेंबर रोजी उघड झालेल्या निघृण हत्याकांडाने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. कर्जत तहसील कार्यालयात परिचारक म्हणून कार्यरत असलेल्या प्रल्हाद सोनाजी साळवे यांचा मृतदेह थेरगाव शिवारातील जांभळ ओढ्याजवळ असलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या पत्र्याच्या खोलीत आढळून आला. सकाळी सुमारे नऊ वाजता ही घटना उघडकीस आली असून, प्राथमिक तपासात हा खून अनैतिक प्रेमसंबंधातून घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे वाचलं का?

प्रल्हाद साळवे हे 12 नोव्हेंबरपासून घराबाहेर गेले होते. त्यांच्याशी संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली होती. मात्र दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह मिळाल्यानंतर खुनाचा संपूर्ण प्रकार समोर आला. या प्रकरणात महत्त्वाचा हात असल्याचा संशय असलेल्या महिला जमली ऊर्फ संध्या गोरख भोसले हिला पोलिसांनी अटक केली आहे.

मयत प्रल्हाद साळवे यांचा मुलगा शुभम प्रल्हाद साळवे (वय 23, रा. रमजान चिंचोली) यांच्या फिर्यादीवरून जमली भोसले आणि तिचा भाऊ धन्या उर्फ धनंजय रजाकार काळे (रा. चिंचोली रमजान) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जमली भोसलेला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली असून तिने काही महत्त्वाची माहिती दिल्याचे स्रोतांकडून समजते.

हेही वाचा : अमरावती : घराच्या दुरुस्तीसाठी आलेल्या मिस्त्रीच्या प्रेमात आकंठ बुडाली, विवाहितेने नवऱ्याला फिल्मी प्लॅन आखून संपवलं

दरम्यान, या प्रकरणातील दुसरा आरोपी धनंजय काळे हा घटनेनंतर फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तैनात केले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास पुढे नेला जात आहे. स्थानिकांना कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास कळवण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, साळवे आणि महिला आरोपी यांच्यातील अनैतिक संबंधांवरून वाद झाला असावा आणि त्यातूनच हा खून घडला असण्याची शक्यता तपासली जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेने मिरजगाव आणि कर्जत परिसरात एकच खळबळ उडाली असून, आरोपीला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शाळेत उशिरा आल्याने शिक्षिकेने 100 उठाबशा काढायला सांगितल्या, वसईतील 6 वीत शिकणाऱ्या अंशिकाचा बालदिनीच मृत्यू

    follow whatsapp