अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबाद येथे आज (12 जून) दुपारी एक मोठा विमान अपघात झाला. अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI171 हे उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले. अहमदाबाद विमानतळाजवळील मेघानीनगर भागात हा अपघात झाला, जिथे विमान कोसळल्यानंतर भीषण आग लागली. या विमानात एकूण 230 प्रवासी आणि 12 कर्मचारी होते. घटनास्थळावरून येणार धूर आणि जळत्या विमानाचे फोटो पाहून या अपघाताची भीषणता आपल्या लक्षात येईल.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान बोईंग 787-8 ड्रीमलाइनर (VT-ANB) विमानाचे होते, जे दुपारी 1.38 वाजता अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टी 23 वरून उड्डाण घेत होते. उड्डाणानंतर लगेचच विमानाने एटीसीला 'मेडे' कॉल दिला, परंतु त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमान हवेत असंतुलित झाले आणि काही सेकंदातच विमानतळाच्या सीमेबाहेर दाट लोकवस्तीच्या भागात पडले. अपघातानंतर लगेचच आग लागली, जी विझवण्यासाठी 7 हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या.
हे ही वाचा>> Ahmedabad Plane Crash: अपघात झालेल्या Air India विमानात होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी!
एअर इंडियाचे निवेदन समोर आले आहे. त्यात म्हटले आहे की विमानात 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते. या विमानात नेमके कोण-कोण प्रवासी होते त्या सगळ्यांची नेमकी माहिती ही आता समोर आली आहे. ज्याची यादीच मुंबई Tak च्या हाती लागली आहे.
घटनेनंतर संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. पोलीस आणि प्रशासनाची पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली. अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि आपत्कालीन सेवा मदत आणि बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाने सांगितले की, गांधीनगरहून एनडीआरएफच्या दोन पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत, ज्यामध्ये 90 जवान तैनात आहेत.
हे ही वाचा>> Air India Plane Crash Video: एअर इंडियाचं विमान असं कोसळलं, थरकाप उडवणारा 'तो' व्हिडिओ आला समोर!
दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि अहमदाबाद पोलीस आयुक्तांशी बोलून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले आणि अधिकाऱ्यांना तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या Air India विमानातील संपूर्ण प्रवाशांची यादी जशीच्या तशी
ADVERTISEMENT
