अमरावती हादरली, कृषी विभागातील लिपिकाची प्रेम प्रकरणातून हत्या, विवाहित महिलेसोबत होते अनैतिक संबंध

Amravati crime : अमरावती हादरली, कृषी विभागातील लिपिकाची प्रेम प्रकरणातून हत्या, विवाहित महिलेसोबत होते अनैतिक संबंध

Amravati crime

Amravati crime

मुंबई तक

25 Oct 2025 (अपडेटेड: 25 Oct 2025, 10:07 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अमरावती हादरली, कृषी विभागातील लिपिकाची प्रेम प्रकरणातून हत्या

point

विवाहित महिलेसोबत होते अनैतिक संबंध

Amravati crime : जिल्ह्यातील मोर्शी शहरात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. उपविभागीय कृषी कार्यालयात कार्यरत असलेल्या लिपिकाची प्रेमप्रकरणातून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला आल्याने संतापाच्या भरात त्याने लोखंडी सळईने मारहाण करून लिपिकाचा खून केला. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली असून, या घटनेने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

येरला विभागाच्या परिसरात आढळला होता मृतदेह 

मृत लिपिकाचे नाव विनोद राऊत (वय 52) असे असून ते मोर्शी येथील उपविभागीय कृषी कार्यालयात कार्यरत होते. गुरुवारी रात्री तालुका फळरोप वाटिका, येरला विभागाच्या परिसरात त्यांचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळला. रात्री उशिरा एका कर्मचाऱ्याला मृतदेह दिसल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आणि प्राथमिक तपासात प्रेमसंबंधातून खून झाल्याचे स्पष्ट झाले.

तपासादरम्यान पोलिसांना समजले की, आरोपी धनराज वानखडे याच्या पत्नीसोबत लिपीक राऊत यांचे अनैतिक संबंध होते. याच कारणावरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते. अखेर गुरुवारी रात्री रागाच्या भरात धनराज वानखडेने राऊत यांच्यावर लोखंडी सळईने हल्ला चढवला. डोक्यावर आणि शरीरावर जबर मारहाण केल्याने राऊत गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला, मात्र पोलिसांनी काही तासांतच त्याला अटक केली.

हेही वाचा : फलटणमधील डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, आतेभावाने फोडलं बिंग, घटनेचे धागेदोरे बड्या नेत्याशी?

मोर्शी पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरून रक्ताचे ठसे, लोखंडी सळई आणि मोबाईल यांसारखे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. आरोपीकडून हत्येचे नेमके कारण, तसेच पूर्वनियोजनाचा भाग होता का? हे शोधण्यासाठी पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद राऊत आणि आरोपीची पत्नी काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. या नात्याबाबत गावात चर्चाही सुरू होती. आरोपी धनराज वानखडेला या गोष्टीचा राग आला होता. काही दिवसांपासून त्यांच्यात तणाव वाढला होता. शेवटी राग अनावर होऊन त्याने गुरुवारी रात्री राऊत यांची हत्या केली.

या घटनेमुळे मोर्शी तालुका तसेच अमरावती जिल्हा हादरला आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असून, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.मोर्शी पोलिस ठाण्याचे पथक पुढील तपास करत असून, मृत लिपिक आणि आरोपीच्या पत्नीमधील संबंध किती दिवसांपासून सुरू होते, तसेच हत्येपूर्वी दोघांमध्ये काय संवाद झाला होता, याचा तपास सुरू आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

दोन तरूण पती-पत्नी म्हणून राहायचे, खोलीतून आला मुलीचा आवाज.. तरुणाने गे पार्टनरचा प्रायव्हेट पार्टच टाकला कापून!

    follow whatsapp