Ashok Kharat Case : महिला लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हे दाखल झालेला भोंदू ज्योतिषी व स्वतःला 'कॅप्टन' असे पद लावणारा अशोक खरात दहावीच्या परीक्षेत दोन विषयांत नापास झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे लोकांची जन्मतारीख ऐकून अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणारा खरात हा दहावीच्या परीक्षेत गणित विषयातही नापास झाल्याचे उघड झाले आहे. 154 देशात भ्रमण केल्याचा दावा करणाऱ्या खरातचे समाजशास्त्रातील ज्ञानही जेमतेमच होते. या विषयातही तो दहावीत फेल होता. त्यामुळे त्याचा पुढचा प्रवास नेमकी इतक्या वेगाने कसा झाला, की सुशिक्षित माणसांना 10 वी नापास भोंदूने गंडवत इमले बांधले आहेत ह्याची चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : डॉक्टरचं 25 वर्षीय शेजारणीवर जीवापाड प्रेम, ह्रदयविकाराचा झटका अन् सीएनजी किटचा स्फोट; हादरवणारं प्रकरण
कुठे झालं शिक्षण? पाहा संपूर्ण माहिती
अशोक खरात याचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी (शिवाजीनगर) असून तो शिक्षणासाठी दररोज सुमारे चार किलोमीटर पायी चालत वावी येथील माध्यमिक शाळेत येत होता. 1 जून 1965 ही त्याची जन्मतारीख शाळेच्या नोंदींमध्ये त्याचे नाव 'लक्ष्मण एकनाथ खरात' असे नमूद असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : दोन पत्नींसोबत एकाच घरात राहायचा, 18 मुलं झाली...,पण शेवटी पोत्यात मृतदेह सापडलं, मुन्नासोबत काय घडलं?
अशोक खरातला कोणत्या विषयात किती मार्क?
सन 1995 मध्ये गॅझेट मध्ये नोंद करून अशोक नाव लावले, याच नावाने त्याने मार्च 1983 मध्ये दहावीच्या बोर्डाची बैठक क्रमांक सी 52341 वर परीक्षा दिली होती. मात्र या परीक्षेत तो गणित आणि समाजशास्त्र या दोन विषयांत नापास झाल्याचे गुणपत्रिकेतून स्पष्ट झाले आहे. गुणपत्रिकेनुसार त्याला मराठी विषयात 39, इंग्रजीत 37, गणितात 28, विज्ञानात 62, समाजशास्त्रात 38 आणि हिंदीत 47 असे एकूण 251 गुण मिळाले होते. एकूण टक्केवारी 35.86 इतकी होती. लोकांना अंकाशास्त्रा आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या खरातचे शैक्षणिक वास्तव समोर आल्यानंतर या प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून एसआयटी तपासाची माहिती, विधानसभेत केले निवेदन
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणी सुरू असलेल्या एसआयटी (SIT) तपासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली. या प्रकरणात कोणताही सरकारी अधिकारी किंवा राजकीय नेता दोषी आढळल्यास त्यांची गय केली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एका महिला अधिकाऱ्याची एसआयटी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भास्कर जाधव आणि विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात काही आयपीएस आणि महसूल अधिकारी गुंतले असल्याचा संशय व्यक्त करत, ही चौकशी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोणासोबत फोटो असणे हा गुन्हा नाही; मात्र खरातचा डिलीट केलेला डेटा रिकव्हर केला जात असून, त्यातून ज्यांचे आर्थिक व्यवहार किंवा मदतीचे पुरावे मिळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. तसेच, एसआयटी चौकशीत कायद्यानुसार न्यायाधीशांच्या हस्तक्षेपाची तरतूद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











