विमानाच्या ढिगाऱ्यात सापडला DVR..हेच आहे का ब्लॅक बॉक्स? काय असतं या डिव्हाईसचं काम?

मुंबई तक

• 07:28 PM • 13 Jun 2025

Ahmedabad Plane Crash DVR : अहमदाबाद विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी विविध पथकांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. ब्लॅक बॉक्समुळे अपघाताच्या कारणांची माहिती मिळते.

ATS found Air India Plane DVR

ATS found Air India Plane DVR

Google CTA

बातम्या हायलाइट

point

एअर इंडियाच्या विमानाचा अपघात का घडला?

point

एटीएसला सापडलं महत्त्वाचं डीव्हीआर?

point

काय असतं ब्लॅक बॉक्सचं काम?

Ahmedabad Plane Crash DVR : अहमदाबाद विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी विविध पथकांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. ब्लॅक बॉक्समुळे अपघाताच्या कारणांची माहिती मिळते. अशातच अपघाताच्या 28 तासानंतर विमानाच्या ढिगाऱ्याखाली डीव्हीआर मिळाला आहे. हे डीव्हीआर ब्लॅक बॉक्सला जोडून पाहिलं जात आहे. हे डीव्हीआर नक्की काय असतं? हे सापडल्याने कोणकोणत्या गोष्टींची माहिती मिळऊ शकते, हे डीव्हीआर कोणत्या कामासाठी वापरलं जातं? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती..

हे वाचलं का?

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात एटीएसने अहमदाबादमध्ये अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडिया विमानाच्या ढिगाऱ्याखालून एक डिजिटल व्हिडीओ रेक़ॉर्डर (डीव्हीआर) जमा केलं आहे. एटीएसच्या अधिकाऱ्याने म्हटलंय, हे एक डिव्हीआर आहे, जे आम्हाला ढिगाऱ्याखाली सापडलं. एफएसएल टीम लवकरच येईल.

काय असतं डीव्हीआर?

डीव्हीआर डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर आहे. विमानाच्या सर्व हालचाली या डीव्हीआरमध्ये रेकॉर्ड होतात. हे डीव्हाईस केबिन, कॉकपिट आणि बाहेरच्या भागातील रेकॉर्डिंग करतं. यामध्ये विमानाच्या हालचालींचा व्हिडीओ डेटा असतो. या डेटाच्या माध्यमातून विमानात बसलेले प्रवासी आणि केबिन क्रू ने दिलेल्या सूचनांना मॉनिटर केलं जाऊ शकतं.

हे ही वाचा >> Air India Plane Crash: रोशनी सोनघरेची इंस्टाग्रामवरची शेवटची पोस्ट अन्...

काय आहे ब्लॅक बॉक्स?

अनेक लोकांचं म्हणणं आहे हे ब्लॅक बॉक्स आहे. परंतु, याला ब्लॅक बॉक्स म्हटलं जाऊ शकत नाही. पण हे डिव्हाईस ब्लॅक बॉक्सची मदत करतं. दोन डिव्हाईस अशा असतात. ज्यांना ब्लॅक बॉक्सचं नाव दिलं जातं. दोन डिव्हाईस असे असतात, ज्यांना ब्लॅक बॉक्सचं नाव दिलं जातं. या दोन डिव्हाईसमध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट वॉईस रेकॉर्डर (CVR), जेव्हा यामध्ये डीव्हीआर समाविष्ट केला जातो, तेव्हा हा डेटा व्हिडीओत देण्याचं काम करतं.

FDR आणि CVR चं काय काम असतं?

FDR चा अर्थ आहे फ्लाईट डेटा रेकॉर्डर. हे फ्लाईट संबंधीत डेटा रेकॉर्ड करतो. या डेटामध्ये फ्लाईटची उंची, स्पीड, इंजिनचं परफॉर्मन्स आणि कंट्रोल इनपूटचा समावेश आहे. हे विमानाच्या सर्व हालचालींचा डेटा ठेवतो. विमान कशा पद्धतीत उड्डाण घेत होतं आणि अपघाताचं नेमकं कारण काय? याची माहिती या डिव्हाईसद्वारे मिळते. 

हे ही वाचा >> सोनम आणि जितेंद्र कुशवाहा यांच्यातील नात्याबाबत खुलासा, लाखो रुपयांचा व्यवहार झाला उघड