बीड : मद्यधुंद कार चालकाने दोघांना उडवलं, पळून जाण्याच्या नादात गाडी दुकानात घुसवली

Beed Accident : याचवेळी रस्त्याने सायकलवरून शाळेकडे जाणाऱ्या एका विद्यार्थ्याची सायकलही या अपघातात खराब झाली. परिसरातील काही नागरिक व विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. या अपघातात आशाबाई राऊत यांच्यासह कारचालक राम धर्मा आणि त्याचा सहप्रवासी धनराज चाळक हे तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Beed Accident

Beed Accident

मुंबई तक

10 Jan 2026 (अपडेटेड: 10 Jan 2026, 03:14 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बीड : मद्यधुंद कार चालकाने दोघांना उडवलं

point

पळून जाण्याच्या नादात गाडी दुकानात घुसवली

Beed Accident , बीड/केज; रोहिदास हातागळे : केज शहरातील गजबजलेल्या कानडी माळी चौकात मद्यधुंद कार चालकामुळे भीषण अपघात घडला. एका मोटारसायकलला मागून धडक देत चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र भरधाव वेगात नियंत्रण सुटल्याने कार थेट दुकानात घुसली. या घटनेत महिला, कारचालक व त्याचा सहप्रवासी जखमी झाले असून दुचाकी, स्कूटर आणि सायकलींचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारी घडलेल्या या घटनेमुळे काही काळ परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, 9 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास कानडी माळी चौकातील भगवान बाबा चबुतऱ्या जवळून स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक एमएच-12/एचझेड-2662) कानडी माळी रोडकडे वळत होती. कारचालक राम लक्ष्मण धर्मा (रा. मेंढक, तेलंगणा) व त्याच्यासोबत असलेला धनराज बन्सी चाळक (रा. लव्हूरी, ता. केज) हे दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप आहे. वळणावर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत एका मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली.

या मोटारसायकलवर मागे बसलेल्या आशाबाई धोंडीबा राऊत (रा. समर्थनगर, केज) या धडकेत जखमी झाल्या. अपघातानंतर थांबण्याऐवजी चालकाने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेगावर ताबा न राहिल्याने कार रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या नेहा ब्युटी शॉपी व साई मंगल सेवा केंद्र या दुकानांच्या दिशेने वळली आणि थेट दुकानात घुसली. दुकानासमोर उभ्या असलेल्या स्कूटर (एमएच-44/एडी-9480) आणि मोटारसायकल (एमएच-25/एस-1723) यांना धडक बसून त्यांचे मोठे नुकसान झाले.

याचवेळी रस्त्याने सायकलवरून शाळेकडे जाणाऱ्या एका विद्यार्थ्याची सायकलही या अपघातात खराब झाली. परिसरातील काही नागरिक व विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. या अपघातात आशाबाई राऊत यांच्यासह कारचालक राम धर्मा आणि त्याचा सहप्रवासी धनराज चाळक हे तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, दत्तात्रय बिक्कड, राजू वाघमारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले तसेच वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, कानडी रोड हा आधीच अरुंद असून दुकानांसमोर साहित्य मांडणे व रस्त्यावर दुचाकी उभी केल्यामुळे कायम वाहतूक कोंडी होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्त्यावरील अतिक्रमण आणि मद्यधुंद वाहनचालकांचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपीची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती, भाजपचा वादग्रस्त निर्णय

    follow whatsapp