भयंकर! डॉक्टरने नवजात अर्भकाला केलं मृत घोषित, कुटुंबियांनी अंत्यसंस्काराची केली तयारी अन् बाळ लागलं रडू

Beed News : बीडच्या आंबेजोगाईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात जन्माला आलेल्या नवजात अर्भकाची योग्य तपासणी न करता त्याला मृत घोषित केलं.

Swami ramanand tirtha hospital Incidence

Swami ramanand tirtha hospital Incidence

मुंबई तक

• 01:10 PM • 10 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

बीडमधील रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

point

नवजात अर्भकाची योग्य तपासणी न करताच केलं मृत घोषित

Beed News : बीडच्या आंबेजोगाईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात जन्माला आलेल्या नवजात अर्भकाची योग्य तपासणी न करता त्याला मृत घोषित केलं. रात्री ते बाळ कुटुंबियांच्या हवाली करण्यात आले होते. त्यानंतर परिस्थिती लक्षात घेत बाळाच्या नातेवाईकांनी आपलं होळ गाव गाठलं. त्या ठिकाणी बाळाच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती. आजीने आपल्या नातवाला बाहेर काढले असता, ते बाळ रडू लागले. त्यानंतर पुन्हा बाळाच्या नातेवाईकांसाठी हा एक सुखद धक्का होता. 

हे वाचलं का?

हेही वाचा : Pune Crime : शरीरसंबंधांना चटावला तरुण, लग्नाचे आमिष दाखवून तरुणींशी शरीरसंबंध, तरुणी गर्भवती राहताच बाळ...

डॉक्टरांनी बाळ मृत असल्याचे सांगितले असता, घुगे कुटुंबाने चार चाकी गाडीने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात धाव घेतली. त्या रुग्णालयात बाळाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. आता या घटनेनं स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. रुग्णालय प्रशानाने संबंधित विभागातील डॉक्टरांची व दुसऱ्या विभागातील डॉक्टरांची अशा दोन समिती नियुक्ती करण्यात आल्या असून चौकशी अहवालानंतर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, या घटनेचा एकूण घटनाक्रम बाळाचे अजोबा सखाराम घुगे यांनी 'मुंबई तक'शी बोलताना सांगितला आहे. 

बाळाच्या अजोबांनी सांगितला घटनाक्रम 

बाळाचे आजोबा सखाराम घुगे म्हणाले की, रुग्णालयात सोमवारी बाळाच्या आईला अॅडमिट केलं होते. त्यानंतर रात्री सात ते आठच्या दरम्यान बाळाच्या आईची प्रसूती झाली होती. प्रसूतीच्या अर्धा ते पाऊन तासानंतर बाळ मृत असून त्याला तुम्ही गावाकडे घेऊन जावू शकता, असे डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर मी सकाळी सहा वाजता रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला, असे आजोबा सखाराम म्हणाले. 

हेही वाचा : 'त्या' एका गैरसमजामुळे भाच्याला मावशीच्या भांगेत सिंदूर लावायला भाग पाडले, नंतर केली बेदम मारहाण, व्हिडिओ तुफान व्हायरल

सकाळी बाळाच्या अंत्यसंस्काराची सुरूवात केली असता, आजीने बाळाचा चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. आजीने बाळाच्या तोंडावरून कापड काढल्यानंतर बाळाने जांभई दिली. त्यानंतर पुन्हा बाळ रडू लागलं असता, बाळाला स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती आजोबा सखाराम घुगे यांनी दिली होती. 

    follow whatsapp