'त्या' एका गैरसमजामुळे भाच्याला मावशीच्या भांगेत सिंदूर लावायला भाग पाडले, नंतर केली बेदम मारहाण, व्हिडिओ तुफान व्हायरल
Crime News : तरुणाचे आपल्याच मावशीशी प्रेमसंबंध असल्याचा ग्रामस्थांना गैरसमज होता. त्यातूनच ग्रामस्थांनी तरुणाला आपल्या मावशीच्या भांगेत शेंदूर लावण्यास भाग पाडले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

24 वर्षीय तरुणाला क्रूरपणे मारहाण

मावशीचे आणि तरुणाच्या प्रेमसंबंधाचा संशय
Crime News : बिहारच्या सुपौला जिल्ह्यात गेल्या आठवड्यात, एका 24 वर्षीय तरुणाला क्रूरपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. तरुणाचे आणि त्याच्या मावशीचे प्रेमसंबंध होते असा लोकांचा समज आहे. त्यामुळेच आता लोकांनी त्याला त्याच्या मावशीसोबत लग्न करण्यास भाग पाडले. ही घटना 2 जुलै रोजी घडली असल्याची माहिचती एनडीटीव्ही वृत्तमाध्यमाने दिली आहे.
हेही वाचा : Pune Crime : शरीरसंबंधांना चटावला तरुण, लग्नाचे आमिष दाखवून तरुणींशी शरीरसंबंध, तरुणी गर्भवती राहताच बाळ...
नेमकं काय घडलं?
वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार, मिथलेश कुमार मुखिया नावाच्या एका तरुणाचे अपहरण करून भीमपूरच्या पोलीस ठाण्यातील परिसरात जीवछापूर वॉर्ड क्रमांक 8 येथील त्याचे काका शिवचंद्र मुखिया यांच्या घरी नेण्यात आले होते. त्यानंतर मिथलेशच्या वडिलांनी दिलेल्या एका तक्रारीत म्हटलं की, शिवचंद्रची पत्नी रिता देवीशी प्रेमसंबंध असल्याच्या आरोपावरून ग्रामस्थांनी त्याच्या मुलाला बेदम मारहाण केली आहे. दरम्यान, शिवचंद्र आणि रिता यांना चार वर्षांचा मुलगा असल्याची माहिती या प्रकरणातून समोर आली.
संबंधित मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मिथलेशला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. यानंतर मिथलेशला रिताच्या भांगेत शेंदूर लावण्यास भाग पाडण्याचा आरोप करण्यात आला.
मिथलेशचे वडील रामचंद्र म्हणाले की, जेव्हा त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला, तेव्हा त्यांना आणि त्यांच्या पत्नीलाही मारहाण केली. त्यांनी सांगितलं की, या मारहाणीत मुलाच्या पाठीवर, मानेवर आणि हातावर गंभीर दुखापत झाली. एका ग्रामस्थाने पोलिसांना माहिती दिली असता, तेव्हा ते घटनास्थळावर पोहोचले होते. त्याचवेळी आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता.
हेही वाचा : गुरू ग्रह मिथून राशीत एकत्र आल्याने १२ वर्षानंतर दुर्मिळ योगायोग घडणार, 'या' राशीतील लोकांच्या खिशात पैसा वाजणार
संबंधित प्रकरणात भीमापूरचे पोलीस मिथिलेश पांडे यांनी सांगितलं की, आरोपींचा सध्या शोध सुरु असून गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. मिथिलेशला प्रथम नरपंतगंज रुग्णालयात दाखल करण्यात आले.