Mumbai News : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई किनारा रस्ता (उत्तर) हा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईचा किनारपट्टी पट्टा एकमेकांशी जोडला जाणार असून, वर्सोवा ते भाईंदर ही नगरे किनारा रस्त्याने जोडली जाणार आहेत. हा मेगा प्रकल्प आंतरबदल व जोडरस्त्यासह सुमारे 60 किलोमीटर लांबीचा असणार आहे. या नव्या दळणवळण व्यवस्थेमुळे वेसावे ते भाईंदर दरम्यानचा प्रवासाचा कालावधी पूर्वीच्या 90 ते 120 मिनिटांवरून घसरून केवळ 15 ते 20 मिनिटांवर येणार आहे.
ADVERTISEMENT
किनारी भागातील दळणवळण
या प्रकल्पाच्या उभारणीचे काम एकूण सात टप्प्यांमध्ये (पॅकेज) विभागण्यात आले आहे. यामध्ये ए, बी, सी, डी, ई, एफ आणि दहिसर-भाईंदर जोड रस्ता (DBLR) यांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकल्पाची निर्मिती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार असून, यामुळे मुंबईच्या किनारी भागातील दळणवळणाला नवे रूप मिळणार आहे.
हे ही वाचा : जळगाव : पहाटे घराबाहेर पडले अन् रेल्वेखाली झोकून दिले; दोन मुलांसह दाम्पत्याची आत्महत्या
अत्याधुनिक सुविधा
प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान विविध प्रकारच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. यामध्ये दुहेरी उन्नत मार्ग (डबल एलिव्हेटेड रोड्स), खारफुटी क्षेत्रातील खांबांवरील रस्ता (रोड्स ऑन स्टिल्ट्स), दोन केबल आधारीत पूल, चार बास्केट पूल, सुमारे 15 मीटर व्यासाचे दोन जुळे बोगदे (ट्विन टनेल) आणि दहा आंतरबदल (इंटरचेन्जेस) यांचा समावेश आहे. या रचनेमुळे वाहतूक अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे.
हे ही वाचा : CJP राजकारणात आल्यास किती टक्के Gen-Z तरुणाई थेट पाठिंबा देणार?
वेळ अन् इंधनाची बचत
मुंबईच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणाऱ्या या प्रकल्पाचे कार्य वेगाने सुरू आहे. या किनारा रस्ता प्रकल्पामुळे केवळ वेळेची बचत होणार नाही, तर इंधनाचीही मोठी बचत होईल आणि मुंबईकरांचा प्रवास अत्यंत सुखकर व आनंददायी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT












