जळगाव : पहाटे घराबाहेर पडले अन् रेल्वेखाली झोकून दिले; दोन मुलांसह दाम्पत्याची आत्महत्या

मुंबई तक

Jalgaon Suicide Case : अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे कौटुंबिक वादातून पती-पत्नीने दोन लहान मुलांसह रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने टाकरखेडा गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ADVERTISEMENT

Jalgaon Crime News
Jalgaon Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल

point

पती-पत्नीची दोन चिमुकल्यांसह रेल्वेखाली आत्महत्या

Jalgaon Suicide Case, मनीष जोग : अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून पती-पत्नीने आपल्या दोन लहान मुलांसह धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत झाल्याने टाकरखेडा गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : पुणे : श्रावणात मटणाचा हट्ट, बापाने लेकाला गळा दाबून संपवलं; आईने काय केलं बघाच...

पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडले, चौघांचा भयंकर शेवट 

टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल आणि त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल हे आपल्या दोन मुलांसह पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडले. पहाटे सुमारे चार वाजता ते घरातून बाहेर पडले होते. त्यांच्यासोबत दुसरी इयत्तेत शिकणारा सनी आणि अंगणवाडीत जाणारा राज हे दोन लहान मुलं होते. चौघेही घराबाहेर पडल्यानंतर रेल्वे मार्गाच्या दिशेने गेले.

हेही वाचा : 'एक कोटी खोका मतदाराला धोका..' ठाकरेंचे नगरसेवक फोडताच पोस्टर्स..