26 वर्षीय बायकोची हत्या करुन अंगणात जाळलं, 'या' कारणामुळे केला शेवट

मुंबई तक

छत्तीसगडमधील रायगड येथे एका पतीवर पत्नीच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने हत्येनंतर मृतदेह जाळला आणि नंतर इतरांची दिशाभूल करण्यासाठी पत्नी बेपत्ता असल्याची खोटी कहाणी रचली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

26 वर्षीय बायकोची हत्या करुन अंगणात जाळलं

point

'या' कारणामुळे केला शेवट

Crime News : एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून पतीने आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत घराच्या अंगणात जाळून उरलेली हाडे जमिनीखाली गाडून टाकली. गुन्ह्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी आरोपीने पत्नी बेपत्ता झाल्याची खोटी कहाणी रचून पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. मात्र, सुमारे चार महिन्यांनंतर डीएनए अहवालामुळे या हत्याकांडाचा पर्दाफाश झाला. छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील ही घटना आहे.

भाजी बनवण्यावरुन वाद

मिळालेल्या माहितीनुसार, 39 वर्षीय देवानंद सिदार आणि 26 वर्षीय चमेली सिदार हे दोघे पती-पत्नी म्हणून एकत्र राहत होते. 16 एप्रिल रोजी रात्री भाजी बनवण्यावरून दोघांमध्ये क्षुल्लक भांडण झाले. या वादातून संतापलेल्या देवानंदने चमेलीचा गळा आवळून तिची हत्या केली. यानंतर आरोपीने मृतदेह अंगणात जाळला आणि अवशेष खड्ड्यात गाडून त्यावर दगड ठेवला. 18 एप्रिलला तो पत्नीच्या माहेरी गेला आणि ती तिथे आली आहे का, अशी विचारपूस केली; त्यानंतर 28 एप्रिल रोजी त्याने कापू पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार नोंदवली.

हे ही वाचा : मुंबईत येणार? जरांगेंनी दोनवेळा सज्ज राहण्यास का सांगितलं?

डीएनए चाचणीत झाला उलगडा

तपासादरम्यान पोलिसांना देवानंदच्या जबाबात अनेक विरोधाभास आढळून आले, ज्यामुळे त्याच्यावर संशय बळकावला. पोलिसांनी वैज्ञानिक पुराव्यांचा आधार घेत न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या (FSL) अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळावरून जळालेल्या हाडांचे अवशेष जप्त केले आणि ते डीएनए चाचणीसाठी पाठवले. डीएनए अहवालात ती हाडे चमेली सिदारचीच असल्याचे स्पष्ट झाले आणि पतीने रचलेला कट उघडकीस आला.

हे ही वाचा : 76 वर्षीय महिलेची बलात्कार करुन हत्या, त्याआधी तीन वर्षीय चिमुकलीवर...

तीन दिवस पाळत अन् अटक

डीएनए चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कापू पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस पथकाने आरोपीच्या अटकेसाठी कारवाई सुरू केली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी फरार झाला होता, परंतु पोलिसांनी गावात तीन दिवस पाळत ठेवून आणि खबऱ्यांच्या मदतीने त्याला अखेर बेड्या ठोकल्या. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.