Kolkata Rape And Murder Case: डॉक्टर बलात्कार-खून प्रकरणात आरोपी संजय रॉयला जन्मठेप, कोर्टाचा मोठा निर्णय

Kolkata Doctor Murder Rape Case Updates : कोलकाताच्या आरजी कर रुग्णालयातील ट्रेनी डॉक्टरवर बलत्कार करून खून करण्याची धक्कादायक घटना घडली होती. यापक्ररणी आरोपी संजय रॉयला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

, Kolkata Doctor Murder Rape Case Updates

, Kolkata Doctor Murder Rape Case Updates

मुंबई तक

• 03:44 PM • 20 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

आरोपी संजय रॉयला न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

point

हे प्रकरण दुर्मिळातलं दुर्मिळ, कोर्टानं नोंदवलं निरीक्षण

point

पीडितेच्या कुटुंबियांनी केली होती फाशीची मागणी 

Kolkata Doctor Murder Rape Case Updates : कोलकाताच्या आरजी कर रुग्णालयातील ट्रेनी डॉक्टरवर बलत्कार करून खून करण्याची धक्कादायक घटना घडली होती. यापक्ररणी आरोपी संजय रॉयला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपीला आयुष्यभर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून हा निर्णय कोलकाताच्या सियालदाह सत्र न्यायालयाने दिला आहे. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांसह सीबीआयने आरोपीला फाशी शिक्षा देण्याची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने फाशीची शिक्षा न सुनावता जन्मठेपेच्या शिक्षेचा निर्णय दिला. न्यायालयाने आरोपी संजयला 50 हजारांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाने हे प्रकरण दुर्मिळातलं दुर्मिळ आहे असं निरीक्षण नोंदवलं.

हे वाचलं का?

शिक्षेचा निर्णय देण्याआधी न्यायाधीश आरोपी संजयला म्हणाले, आम्ही तुला आधीच सांगितलं होतं की, तुझ्यावर लावलेले बलात्कार आणि हत्येचे आरोप सिद्ध झाले आहेत. शिक्षेबाबत तुला काय म्हणायचं आहे? यावर आरोपी संजयने म्हटलं, मला कोणत्याही कारणाशिवाय फसवण्यात आलं आहे. मी नेहमी रुद्राक्ष माळ घालतो. जर मी गुन्हा केला असता, तर त्याचवेळी रुद्राक्ष माळ तुटली असती. मला बोलू दिलं नाही. अनेक कागदांवर जबरदस्ती सही घेतली.

हे ही वाचा >>  Nandurbar Stone Pelting: दोन वाहनांची धडक, भांडण आणि थेट दगडफेक, नंदुरबारमध्ये तणाव, नेमकं प्रकरण काय?

संजयने दिलेल्या जबाबावर न्यायाधीश म्हणाले, आम्ही तुला म्हणणं मांडण्यासाठी जवळपास अर्धा दिवस दिला होता. मी तुझं म्हणणं 3 तास ऐकलं. माझ्या समोर जे काही आरोप, पुरावे, कागदपत्रे, साक्षीदार ठेवण्यात आले, त्यांची तपासणी करण्यात आली आहे. याच्या आधारावर तू दोषी सिद्ध झाला आहेस. तू आधीच दोषी म्हणून सिद्ध झाला आहे. आता मी फक्त शिक्षेविषयी तुझं म्हणणं ऐकू शकतो. तुझ्या कुटुंबात कोण कोण आहे? ते तुला संपर्क करतात का? यावर संजय म्हणाला, मी जेव्हापासून तुरुंगात आहे, मला भेटायला कोणीच आलं नाही.

हे ही वाचा >> Yogesh Mahajan Death : सेटवर आला नाही, फ्लॅटचा दरवाजा तोडल्यानंतर मृतावस्थेत आढळला अभिनेता...

पीडितेच्या कुटुंबियांनी केली होती फाशीची मागणी 

संजय रॉयच्या वकीलांनी म्हटलं, हे दुर्मिळ प्रकरण आहे. मी तुम्हाला केस रेफरन्स देऊ शकतो. सुप्रीम कोर्टाने आधीच सुधारणेबाबत सांगितलं आहे. फाशीच्या ऐवजी वैकल्पिक शिक्षेबाबत विचार केला पाहिजे. याचरदम्यान, पीडितेच्या कुटुंबांनी म्हटलं की, न्यायालयाने संजय रॉयला दोषी सिद्ध केलं आहे. यामुळे त्याला फाशीची शिक्षा पाहिजे.

    follow whatsapp