Nandurbar Group Clash : दोन वाहनांची धडक, भांडण आणि थेट दगडफेक, नंदुरबारमध्ये तणाव, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

Nandurbar Group Clash: ए.एस.पी श्रवण एस दत्त यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, 'रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एका विशिष्ट समुदायाच्या गटाने दगडफेक सुरू केली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नंदुरबारमध्ये दोन गटातील वादानंतर दगडफेक

point

पोलिसांकडून वेळीच परिस्थिती नियंत्रणात

point

अपघातानंतर नेमकं काय घडलं होतं?

Nandurbar Group Clash:नंदुरबार शहरात रिक्षा आणि मोटारसायकलमध्ये झालेल्या धडकेनंतर दोन गट आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आतापर्यंत कोणत्याही मालमत्तेचं नुकसान किंवा जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आणली जात आहे. सोमवारी सकाळी वातावरण नियंत्रणात आहे. 

हे ही वाचा >>  Mumbai Police : धारावीत बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांकडून अटक, काय समोर आलं?

ए.एस.पी श्रवण एस दत्त यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, 'रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एका विशिष्ट समुदायाच्या गटाने दगडफेक सुरू केली. आधीच्या दिवशी एक घटना घडली होती, ज्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही वेळाने दगडफेकीच्या बातम्या आल्या. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती आता नियंत्रणात आहे. ते म्हणाले की, पोलीस बंदोबस्त तैनात केल्यामुळे हिंसाचार इतर भागात पसरला नाही. कोणत्याही मालमत्तेचं नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. दगडफेकीत सहभागी असलेल्या काही संशयितांची ओळख पटली आहे.

जळगावमध्ये ट्रेनवर दगडफेक

हे ही वाचा >>Pankaja Munde : "मी बीडची लेक, मला बीडचं पालकमंत्रिपद मिळालं असतं तर...", पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

काही दिवसांपूर्वी जळगाव रेल्वे स्थानकाजवळ तापी गंगा एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, फक्त B6 कोचच्या खिडकीच्या काचांचं नुकसान झालं होतं. जळगाव रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तापी गंगा एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X द्वारे दगडफेकीची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात तक्रार नोंदवली.

हे वाचलं का?

    follow whatsapp