Yogesh Mahajan Death : सेटवर आला नाही, फ्लॅटचा दरवाजा तोडल्यानंतर मृतावस्थेत आढळला अभिनेता...
योगेश महाजन हे एका मालिकेच्या शुटींगसाठी सेटवर राहत होते. तो शूटिंगसाठी आला नाही, तेव्हा क्रू मेंबर्सनी त्यांच्या फ्लॅटमध्ये जाऊन पाहिलं. खूप वेळा दरवाजा वाजवूनही ते दरवाजा उघडत नसल्यानं त्यांनी दरवाजा उघडला नाही.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अभिनेत्याचा फ्लॅटमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ
सेटवर अभिनेता पोहोेचला नाही म्हणून फ्लॅटवर गेले होते सहकारी
मराठी चित्रपट, हिंदी मालिकांमध्ये केलं होतं काम
मनोरंजन विश्वातून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. हिंदी टीव्ही मालिका आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करणारा प्रसिद्ध अभिनेता योगेश महाजन याचं काल (19 जानेवारी) निधन झालं. या अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. योगेशच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून, अनेकांना या घटनेवर विश्वास ठेवणं कठीण जातंय.
मृत्यू कसा झाला?
हे ही वाचा >> Nandurbar : दोन वाहनांची धडक, भांडण आणि थेट दगडफेक, नंदुरबारमध्ये तणाव, नेमकं प्रकरण काय?
योगेश महाजन हे एका मालिकेच्या शुटींगसाठी सेटवर राहत होते. तो शूटिंगसाठी आला नाही, तेव्हा क्रू मेंबर्सनी त्यांच्या फ्लॅटमध्ये जाऊन पाहिलं. खूप वेळा दरवाजा वाजवूनही ते दरवाजा उघडत नसल्यानं त्यांनी दरवाजा उघडला नाही. जेव्हा त्यांनी दरवाजा तोडला तेव्हा योगेश मृतावस्थेत आढळला. त्यानंतर या अभिनेत्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय.
इंडिया टुडेशी झालेल्या संभाषणात त्यांच्या सह-कलाकार आकांक्षा रावत यांनी अभिनेत्याच्या मृत्यूची माहिती दिली. अभिनेत्रीने योगेशबद्दल सांगितलं- तो खूप आनंदी व्यक्ती होता. त्याची विनोदबुद्धीही खूप चांगली होती. आम्ही एका वर्षाहून अधिक काळ एकत्र शूटिंग करत आहोत. त्याच्या जाण्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.










