‘गणराया, लोकशाहीवरील विघ्न दूर कर !’, ‘सामना’तून जनतेसाठी साकडं

मुंबई तक

19 Sep 2023 (अपडेटेड: 19 Sep 2023, 06:53 AM)

गणेश चतुर्थीनिमित्त सामना अग्रलेखातून राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. सामनातून टीका करताना लोकांच्या भावना काय आहेत. त्यातून या सरकारने कशा प्रकारच्या फसव्या घोषणा केल्या आहेत त्यावरूनच केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरण्यात आले आहे.

prayer offered to criticize Ganaraya for criticizing announcements state government and central government from the Samana editorial article

prayer offered to criticize Ganaraya for criticizing announcements state government and central government from the Samana editorial article

follow google news

Samana Editorial : राज्यापासून ते देशापर्यंत सध्या फक्त या सरकारकडून फक्त डंका आणि बोभाट्याचे फुगेच हवेत सोडले जात असल्याची टीका सामनातून राज्य आणि केंद्र सरकारवर (central government) करण्यात आली आहे. यावेळी सामनातून गणरायाला साकडे घालताना शेतकऱ्यांपासून ते बेरोजगारीपर्यंतच्या प्रश्नावरुन सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. शिंदे सरकारला (Shinde government) मिंधे सरकार हिणवत दोन दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक (cabinet meeting) झाली. त्यामध्ये सुमारे 50 हजार कोटींच्या ‘पॅकेज’ची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तर एकीकडे दुष्काळ, नापिकी, त्यातून उद्भवलेला कर्जबाजारीपणा आणि त्यामुळे वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुसरीकडे मिंधे राज्यकर्त्यांच्या फसव्या घोषणा हे राज्यावरील एक गंभीर संकटच असल्याचे सांगत सामनातून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. (criticism of state and central government announcements samana editorial article)

हे वाचलं का?

जनतेची इडापीडा नष्ट कर

आज राज्यातील प्रत्येकाच्या घरी गणरायाचे विराजमान झाले आहे. त्यानिमित्ताने सामनातून लोकांच्या मनातील सरकारविषयीच्या काय भावना आहेत. हे सांगत राज्य आणि केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशात वाढलेला दंभ आणि सुंभ, जनतेची इडापीडा नष्ट कर आणि लोकशाहीवरील विघ्न दूर कर अशीच प्रार्थना तमाम गणेशभक्तदेखील आज घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पांच्या चरणी करीत असतील. त्या गणरायाकडे देशात वाढलेला दंभ आणि सुंभ, जनतेची इडापीडा नष्ट कर आणि लोकशाहीवरील विघ्न दूर कर!’ अशीच प्रार्थना तमाम गणेशभक्तदेखील आज घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पांच्या चरणी करीत असतील असा टोलाही सामनातून लगावला आहे.

मिंधे राज्यकर्त्यांच्या फसव्या घोषणा

राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार अस्तित्वात आल्यापासून फक्त घोषणांच्या पलिकडे जनतेला सरकारचा काही फायदा झाला नाही. दोनच दिवसापूर्वी मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीतून मराठवाड्यासाठी 50 हजारच्या पॅकेजची मोठी घोषणा झाली मात्र देवेंद्र फडणवीस असताना दिलेल्या पॅकेजचं काय झालं असा सवालही सामनातून करण्यात आला आहे. शिंदे सरकारने केलेल्या घोषणा या राज्यकर्त्यांच्या फसव्या घोषणा असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

राज्यावरील एक गंभीर संकटच

सामनातून राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना त्यांनी ही दोन्ही सरकारं म्हणजे राज्यावरील एक गंभीर संकटच असल्याचा टोला त्यांनी दोन्ही सरकारला लगावला आहे. फक्त घोषणा देणारे आणि नागरिकांना कोणतीही मदत न देणारी ही दोन्ही सरकार म्हणजे राज्यावरील एक गंभीर संकटच असल्याचा टोला त्यांनी राज्य सरकारबरोबरच केंद्रावरही केला आहे.

महाराष्ट्राच्या माथी लादलेले हे संकट

सामना अग्रलेखातून राज्य आणि केंद्रावर टीका करताना महाराष्ट्राच्या माथी लादलेले हे संकट असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. टीका करताना त्यांनी दिल्लीश्वरांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्राच्या माथी लादलेले हे संकट कायमचे दूर कर अशी प्रार्थनादेखील त्यांनी केली आहे. केंद्रातील स्वयंघोषित राजकर्त्यांबाबतही यापेक्षा वेगळी स्थिती नसल्याचे सांगत महागाईपासून बेरोजगारीपर्यंत, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यापासून रोजगारनिर्मितीपर्यंत, धर्मापासून विकासापर्यंत, देशाच्या संरक्षणापर्यंत हे फक्त देशावर आणि राज्यावर लादलेले हे संकट आहे असाच टोला सामनातून लगावला आहे.

फक्त डंका आणि बोभाट्याचे फुगे

राज्य सरकारने मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीवेळी मराठवाड्यासाठी 50 हजारची घोषणा करण्यात आली मात्र मागील केलेल्या घोषणांचे काय झाले असा सवाल करण्यात आला आहे. तसेच केंद्राकडूनही फक्त जनतेला घोषणाच मिळत आहेत. त्यामुळे या सरकारच्या फक्त डंका आणि बोभाट्याचे फुगेच असल्याचे सांगण्यात आले आहे.

अनेक गोष्टींची ‘हूल’

राज्य आणि केंद्रावर गंभीर आरोप करताना सामनाच्या अग्रलेखातून जोरदार निशाणा साधला आहे. राज्याराज्यामध्ये जातीय, धार्मिक ध्रुवीकरण,त्यातून दंगली पेटवून त्यावर राजकीय स्वार्थाच्या पोळ्या भाजण्याचे सत्तापक्षाचे इरादे आहेत. महागाई, बेरोजगारी आणि इतर संकटांनी गांगरलेल्या देशवासीयांना धर्म आणि श्रद्धेच्या गुंगीत गुंतविण्याचे कारस्थान सुरू असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यासाठी अयोध्येतील श्रीराम मंदिरापासून समान नागरी कायदा एक देश-एक निवडणूक अशा अनेक गोष्टींची हूल दिली जात आहे असा शब्दात सामनातून सरकारचा समाचार घेतला आहे.

‘इंडिया नव्हे भारत’ची उचकी

केंद्र सरकारच्या विरोधात विरोधकांनी वज्रमूठ बांधत इंडिया आघाडी केली. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आहेत. विरोधकांच्या एकीमुळेच आता भविष्यातील निवडणूक सरकारसाठी अवघड आहे. त्यामुळेच केंद्राने इंडिया बदलून भारत नावासाठी केंद्रान आग्रह धरला आहे. त्यामुळेच केंद्राला इंडिया नव्हे भारतची उचकी लागल्याची टीका त्यांनी केली आहे.

    follow whatsapp