Cyclone Michaung Updates : मिचॉन्ग चक्रीवादळ किनारपट्टीवर, महाराष्ट्राला किती धोका?

रोहिणी ठोंबरे

04 Dec 2023 (अपडेटेड: 04 Dec 2023, 04:40 AM)

भारतीय किनारपट्टीवर पुन्हा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. मिचॉन्ग चक्रीवादळ किनारपट्टीजवळ येताच चेन्नईच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला.

Cyclone Michaung on the Indian coast how much of a threat to Maharashtra

Cyclone Michaung on the Indian coast how much of a threat to Maharashtra

follow google news

Cyclone News : भारतीय किनारपट्टीवर पुन्हा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. दक्षिण भारतातील (South India) अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचे कारण मिचॉन्ग वादळ (Michaung Cyclone) असल्याचे मानले जाते जे लवकरच चक्रीवादळाचे रूप धारण करू शकते. (Cyclone Michaung on the Indian coast how much of a threat to Maharashtra)

हे वाचलं का?

या चक्रीवादळाबाबत हवामान खात्यानेही (meteorological department) अलर्ट जारी केला आहे. हे मिचॉन्ग आहे तरी काय?, त्याचे चक्रीवादळात रूपांतर कधी होईल? आणि देशातील कोणत्या राज्यांवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

वाचा : Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना PM मोदींबद्दल असं काय बोलली की लोक करताहेत ट्रोल?

तामिळनाडूत बचाव कार्य

मिचॉन्ग चक्रीवादळ किनारपट्टीजवळ येताच चेन्नईच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. यासोबतच कांचीपुरममध्येही अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचल्यानंतर एनडीआरएफच्या टीमने पीरकंकरनई आणि पेरुंगलाथूर जवळील तांबरम परिसरातून सुमारे 15 लोकांचा जीव वाचवला.
तामिळनाडूमध्ये धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त पाणी वाहत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव बेसिन ब्रिज आणि व्यासरपाडी दरम्यानचा पूल क्रमांक 14 थांबवण्यात आला आहे.

महाराष्ट्राला ‘मिचॉन्ग’ वादळाचा किती धोका?

हवामान खात्याच्या माहितीनुसार, चक्रीवादळ मिचॉन्ग 3 डिसेंबरच्या रात्री चेन्नईच्या 150 किमी पूर्व-आग्नेय दिशेला बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य-पश्चिमेकडे केंद्रीत होते. 5 डिसेंबरच्या सकाळच्या वेळी नेल्लोर आणि मछलीपट्टनम (आंध्र प्रदेश) दरम्यान ते उत्तर-वायव्य दिशेने सरकण्याची, तीव्र शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा धोका आहे.

वाचा : Assembly elections 2023: काँग्रेसचे टोचले कान, भाजपला चिमटे; शिवसेनेचं UBT म्हणणं काय?

तसंच, महाराष्ट्रात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडल्यास शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण होईल. या दरम्यान राज्या सरकारने यापूर्वी झालेल्या नुकसानीची पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

वादळामुळे अनेक गाड्या रद्द

डॉ. एमजीआर चेन्नई सेंट्रल येथून 4 डिसेंबर रोजी धावणाऱ्या सहा गाड्या – म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस, कोईम्बतूर कोवई एक्सप्रेस, कोईम्बतूर शताब्दी एक्सप्रेस, केएसआर बंगळुरू एसी डबल डेकर एक्सप्रेस, केएसआर बंगळुरू वृंदावन एक्सप्रेस, तिरुपती सप्तगिरी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. चेन्नई हवामान खात्याने तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये पाऊस, वादळ आणि विजांचा कडकडाट जोरदार होण्याचा इशारा दिला आहे.

वाचा : तीन राज्यातील विजयानंतर PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले ‘देशविरोधी…’

चक्रीवादळाला ‘मिचॉन्ग’ नाव कसे पडले?

दक्षिण भारतातील राज्यांना धोका निर्माण करणाऱ्या या चक्रीवादळाला ‘मिचॉन्ग’ असे नाव देण्याचा निर्णय म्यानमारने प्रस्तावित केला होता. मिचॉन्ग हे नाव चिकाटी आणि लवचिकता दर्शवते. हिंदी महासागरात निर्माण होणारे हे सहावे चक्रीवादळ असेल आणि 2023 मध्ये बंगालच्या उपसागरात तयार होणारे चौथे चक्रीवादळ असेल.

    follow whatsapp