India Russia Trade Deal: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आता भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या भारत भेटीपूर्वी त्यांनी मॉस्कोमधील क्रेमलिन येथे मीडिया चॅनेल 'आज तक'ला एक सुपर-एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. मुलाखतीत पुतिन यांनी भारत-रशिया मैत्री, पंतप्रधान मोदींचे नेतृत्व, जागतिक बदल, पाश्चात्य दबाव, ट्रम्पची धोरणे आणि युक्रेन संघर्ष यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य केलं.
ADVERTISEMENT
पंतप्रधान मोदी आपले मित्र असल्याचं सांगून पुतिन म्हणाले की, "भारत आज जगातील सर्वात स्थिर आणि विश्वासार्ह भागीदार आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने मिळवलेली प्रगती खरंच चमत्कारिक आहे. भारताचे सरासरी आयुर्मान दुप्पट झाले असून यातून भारताची प्रगती दिसून येते."
एससीओच्या कार डिप्लोमसीबाबत खुलासा
एससीओ बैठकीदरम्यान मोदी-पुतिन यांच्या कारमधील प्रवासाबद्दल विचारलं असता पुतिन म्हणाले की SCO बैठकीदरम्यान ते आणि पंतप्रधान मोदी कोणत्याही पूर्व नियोजनाशिवाय एकाच कारमध्ये बसले होते. त्यांनी सांगितलं की "आम्ही दोघेही बाहेर पडलो. मला माझी गाडी समोर दिसली, म्हणून मी त्यांना माझ्यासोबत यायला सांगितलं. मित्रांमध्ये असंच घडतं, त्यात वेगळं असं काहीच नव्हतं. त्यांनी कारमध्ये देशातील चालू घडमोडींवर चर्चा केली. ते म्हणाले - "दोन मित्रांमधील बोलण्याप्रमाणेच आमच्यात संवाद झाला."
हाय-टेक भागीदारीवर भाष्य
पुतिन यांनी मुलाखतीत सांगितलं की, "भारत आणि रशिया आता संरक्षणाच्या पलीकडे, हाय-टेक, अंतराळ (स्पेस), अणुऊर्जा, एआय (AI), शिपबिल्डिंग आणि विमान निर्मितीसह नवीन उंची गाठण्यासाठी सज्ज आहेत." पुतिन यांच्या भेटीदरम्यान बऱ्याच मुख्य करारांची घोषणा केली जाईल.
मुलाखतीदरम्यान, पुतिन यांनी स्पष्ट केलं की भारत सध्या आमच्याकडून स्वस्त दरात तेल खरेदी करत आहे आणि ते मोठ्या प्रमाणात युरोपियन बाजारपेठेत पुरवत आहे. हे आमच्या दशकांच्या जुन्या संबंधांमुळे आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक लोक संतप्त असून ते नवीन राजकीय डावपेचांनी भारताला त्रास देत आहेत.
संरक्षण भागीदारीबद्दल मोठी चर्चा
पुतिन यांनी सांगितलं की भारत केवळ रशियन शस्त्रे खरेदी करत नाही तर रशियाच्या सहकार्याने तंत्रज्ञान देखील विकसित करतो. यामध्ये ब्राह्मोस, कलाश्निकोव्ह आणि टी-90 सारखे प्रकल्प समाविष्ट आहेत. एस-400 आणि एस-500 च्या वितरणाबाबत, त्यांनी म्हटलं की भारताला वेळेवर पुरवठा होत राहील.
ट्रम्प, टॅरिफ आणि युक्रेन युद्धावर भाष्य
डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडील विधानांबद्दल पुतिन म्हणाले की ते कोणत्याही नेत्यावर वैयक्तिकरित्या भाष्य करत नाहीत. त्यांनी स्पष्ट केलं की अमेरिका स्वतः रशियाकडून ऊर्जा खरेदी करते, ज्यामध्ये अमेरिकेत कार्यरत असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पांसाठी युरेनियमचा समावेश आहे. त्यामुळे, भारताच्या तेल खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे अयोग्य आहे. या मुद्द्याचा सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे. आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्यास देखील तयार आहोत.
टॅरिफ धोरणाबद्दल ते म्हणाले की रशिया आणि भारत कोणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत - "आम्ही फक्त आमच्या सामान्य हितांचे रक्षण करतो."
जारेड कुशनर आणि स्टीव्ह विटकॉफ यांच्यासोबतच्या पाच तासांच्या बैठकीत बोलताना पुतिन म्हणाले की ही एक महत्त्वाची पण गुंतागुंतीची चर्चा होती.
हे ही वाचा: Exclusive: रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची India Today ला दिलेली रोखठोक मुलाखत जशीच्या तशी... वाचा मराठीमध्ये!
पुतिन-ट्रम्प अलास्का बैठकीबद्दल ट्रम्प काय म्हणाले?
अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीत पुतिन म्हणाले की, शांतता प्रस्थापित करण्याची ट्रम्पची 'प्रामाणिक इच्छा' त्यांना जाणवली. पुतिन यांच्या मते, "ट्रम्प यांना हे युद्ध जितकं लवकर संपेल तितकं चांगलं, हे समजतं. पण राजकीय आणि आर्थिक दोन्ही बाबींवर इतरही विचार आहेत आणि मला खात्री आहे की अमेरिका यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे."
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत रशियासोबत उभा
पहलगाम आणि दिल्लीतील दहशतवादी घटनांबाबत जगाच्या दुटप्पी निकषांबद्दल पुतिन म्हणाले की, दहशतवाद्यांचे समर्थन केले जाऊ शकत नाही. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशिया भारतासोबत उभा आहे.
भारत-चीन मुद्द्यावर पुतिन काय म्हणाले?
रशिया चीन आणि भारतासोबतच्या संबंधांमध्ये कसा समतोल साधतो याबद्दल पुतिन म्हणाले की, भारत आणि चीन हे आपले जवळचे मित्र आहेत. पुतिन म्हणाले, "मला वाटत नाही की आपण त्यांच्या द्विपक्षीय बाबींमध्ये हस्तक्षेप करावा. मला माहिती आहे की पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग जटिल वादग्रस्त मुद्द्यांवर निष्कर्षापर्यंत पोहोचतील. दोन्ही नेते दोन्ही देशांमधील तणावाबद्दल चिंतित आहेत. त्यांना समस्या सोडवायची आहे. ते प्रयत्न करत आहेत आणि ते एका निष्कर्षापर्यंत पोहोचतील. मी दोघांसाठी खूप आनंदी आहे. मला वाटत नाही की मी हस्तक्षेप करावा; हे द्विपक्षीय प्रकरण आहेत."
ADVERTISEMENT











