Dharashiv News : गणेश जाधव - धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावरून एका महिला कुस्तीपटूने आपल्या तीन मुलांसह आत्महत्या केल्याची घटना आहे. या दुर्घटनेत आईसह साडे पाच वर्षांचा मुलगा अजिंक्यचा जागीच मृत्यू झाला होता. तर इतर दोन जुळ्या मुलींपैकी एका क्रांती नावाच्या मुलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसऱ्या वीरा नावाच्या मुलीवर धाराशिव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू ठेवण्यात आले आहेत. या घटनेनं धाराशिव हादरून गेलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : जन्माष्टमी दिवशी हर्षण योग, 'या' राशींसाठी विशेष दिवस
मृत आई ही एक राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू होत्या, तिची अश्विनी पोळ अशी ओळख समोर आली. मृत महिलेचे पती मनोहर पौळ हे देखील एक कुस्तीपटू क्षेत्राशी संबंधित असून दोघेही पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होते. अश्विनी या एमएसएफफमध्ये नोकरी करत होत्या. मात्र चार महिन्यांपूर्वी पतीच्या सांगण्यावरून त्यांनी नोकरी सोडल्याची माहिती समोर आली. गेल्या काही महिन्यांपासून माहेरी राहत असल्याचेही समजते.
घटनेच्या दिवशी अश्विनी या आपल्या तीन मुलांसोबत केक घेऊन नळदुर्ग किल्ल्यावर आल्या होत्या. ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यास परवानगी नसल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी त्यांना दिली होती. केक घेऊन किल्ल्यात त्यांनी प्रवेश न करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर प्रवेशद्वाराजवळ केक कापून वाढदिवस साजरा केला. मात्र, हा वाढदिवस नेमका कोणाचा होता? याबाबत अद्यापही स्पष्ट माहिती समोर आली नाही. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रासह क्रीडा क्षेत्रात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या एका गुणी महिला खेळाडून आपल्या मुलांसह टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वडिलांकडून गंभीर आरोप
अश्विनी मोहिते पौळ यांचे वडील तानाजी शिवाजी मोहिते यांनी गंभीरपणे आरोप करत प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. सासरच्या मंडळींसह पतीकडून सततच्या मानसिक त्रासाने लेकीने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना आहे. या आरोपांची सतत्या पडताळण्यासाठी पोलिसांनी चौकशी केली.
अश्विनी पौळ नेमक्या कोण?
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील व्हंताळ गावच्या रहिवासी असलेल्या अश्विनी तानाजी मोहिते (विवाहानंतर अश्विनी मनोहर पौळ रा आंबूलगा निलंगा लातूर) या राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू होत्या. त्यांच्या कुटुंबातील वडील, आई, भाऊ आणि बहीण हे देखील कुस्तीशी संबंधित आहेत, तर पती मनोहर पौळ हेही कुस्तीपटू आहेत.
हे ही वाचा : मुंबई : सर्वांना सोडलं, शेवटी स्कूल बसमध्ये चिमुरडी एकटी राहिली, ड्रायव्हरने केला अत्याचार
राष्ट्रीय पातळीवर अश्विनी पौळ यांची चमकदार कामगिरी
2007 मध्ये केरळमधील तिरुवनंतपुरम येथे सुवर्णपदक. 2008 मध्ये पंजाबमधील गुरुदासपूर आणि 2009 मध्ये चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांनी सुवर्णपदके मिळवलीत.
ADVERTISEMENT












